TRENDING:

मर्सिडीजच्या G Wagon सारखा लूक, दणकट बॉडी, Mahindra आणली 10 लाखांमध्ये नवी SUV

Last Updated:
एकापेक्षा एक धडाकेबाज एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच करणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राने आपली आणखी एक धाकट अशी एसयूव्ही लाँच केली आहे.
advertisement
1/7
मर्सिडीजच्या G Wagon सारखा लूक, दणकट बॉडी, Mahindra आणली 10 लाखांमध्ये नवी SUV
एकापेक्षा एक धडाकेबाज एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच करणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राने आपली आणखी एक धाकट अशी एसयूव्ही लाँच केली आहे. बोलेरोचं निओ बोल्ड एडिशन लाँच करण्यात आलं आहे. महिद्राने या नवीन बोलेरोमध्ये अनेक चांगले असे फिचर्स दिले आहे. एवढंच नाहीतर लूकमध्येही थोडे बदल केले आहे. ग्रामीण भागाची शान असलेल्या बोलेरोचा आता हायटेक असा लूक आला आहे. मागील अनेक वर्षांपासून बोलेरोमध्ये कोणतेही बदल केले नव्हते पण आता एका आलिशान एसयुव्ही सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
2/7
महिंद्रा ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलेरो आणि बोलेरो निओ बोल्ड एडिशनचा अधिकृत व्हिडिओ रिलीज केला आहे. या व्हिडिओवरून बोलेरो लोकप्रिय डायमंड व्हाइट रंगात आहे ज्याच्या बाजूला आणि दरवाजाच्या पॅनलवर तीन ग्राफिक्स आहेत. यात दोन गडद राखाडी किंवा गन मेटल फिनिश केलेल्या उभ्या स्लॅट्ससह एक कॉन्ट्रास्टिंग पूर्ण-काळ्या फ्रंट ग्रिल आहे.
advertisement
3/7
दुसरीकडे, महिंद्राच्या लोगोला चमकदार क्रोम टच आहे. फ्रंट बंपरमध्ये काळ्या पॅनेलमध्ये मेटल फिनिश आणि पिवळ्या ग्राफिक्ससह फॉग लॅम्प आहेत. साईड बॉडी पॅनल्स आणि डी-पिलरच्या शेजारी, बोलेरो तिचा बोल्ड एडिशन बॅज दाखवते. महिंद्राने मागील लाईट बदलले आहेत, जे पारदर्शक लेन्स आहेत.
advertisement
4/7
इंटीरियर डिझाइन आणि लेआउट समान आहे तसंच ब्लूटूथ साउंड सिस्टम कायम ठेवली आहे. बोलेरो बोल्ड एडिशनच्या डिजिटल मध्ये ड्रायव्हर इन्फो सिस्टम ठेवली आहे. जी सध्याचे मायलेज, ट्रिप अंतर, उघड्या डोअर अलर्टची माहिती देतो. १४९३ सीसी डिझेल इंजिन आहे जे पॉवरट्रेन ३६०० आरपीएमवर ७५ बीएचपी आणि १६०० - २२०० आरपीएमवर २१० एनएम टार्क जनरेट करते आणि ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिलं आहे.
advertisement
5/7
बोलेरो निओ बोल्ड एडिशनमध्ये सिल्व्हर फिनिश मेशसह क्रोम-फिनिश्ड फ्रंट ग्रिल आहे. निओ बोल्ड एडिशनच्या फ्रंट बंपरमध्ये हनीकॉम्ब ग्रिल आहे ज्यामध्ये फॉग लॅम्प बसवले आहेत.
advertisement
6/7
स्पेअर व्हील कव्हर आणि मागील एअर कंडिशनिंग व्हेंट्स पूर्णपणे काळे आहेत. केबिनमध्ये गडद थीम व्यतिरिक्त, त्यात पूर्णपणे काळ्या रंगाचे अपहोल्स्ट्री, नेक-पिलो आणि सीटबेल्ट कव्हर देखील आहेत.
advertisement
7/7
बोलेरो निओ बोल्ड एडिशनमध्ये १.५-लिटर mHawk डिझेल इंजिन आहे जे ३७५० आरपीएम वर ९८.५ बीएचपी आणि १७५० - २२५० आरपीएम वर २६० एनएम टॉर्क निर्माण करते. या नव्या बोलेरोची किंमत 10.92 लाखांपासून सुरू होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
मर्सिडीजच्या G Wagon सारखा लूक, दणकट बॉडी, Mahindra आणली 10 लाखांमध्ये नवी SUV
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल