TRENDING:

Tesla काहीच नाही! पुण्यात तयार होणाऱ्या कारची रेंज तब्बल 857 किमी, मुंबई-पुणे शुन्य खर्चात फिरा!

Last Updated:
एकीकडे चायनिज कंपन्यांच्या ईलेक्ट्रिक कार सर्वाधिक रेंज देत आहे. पण त्या भारतात कधी येणार याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण भारतीय मार्केटमध्ये सध्या अशा इलेक्ट्रिक कार आहे, ज्यांची रेंजही सर्वाधिक आहे.
advertisement
1/7
पुण्यात होते तयार, या कारची रेंज तब्बल 857 किमी, मुंबई-पुणे शुन्य खर्चात फिरा
भारतात सध्या इलेक्ट्रिक कारचा मोठा बोलबाला आहे. जर तुम्हाला एसयूव्ही गाडीवर पेट्रोल किंवा डिझेल खर्च करून वैतागला असेल तर इलेक्ट्रिक एसयूव्ही कधीही फायद्याचा विषय ठरणार आहे. एकीकडे चायनिज कंपन्यांच्या ईलेक्ट्रिक कार सर्वाधिक रेंज देत आहे. पण त्या भारतात कधी येणार याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण भारतीय मार्केटमध्ये सध्या ५ अशा इलेक्ट्रिक कार आहे, ज्यांची रेंजही सर्वाधिक आहे.
advertisement
2/7
भारतात सध्या सर्वाधिक रेंज देण्याचा मान हा Mercedes-Benz EQS 580 4MATIC ला मिळतो. ही कार एकदा फुल चार्ज केल्यावर 857 किमी रेंज देते. यात 107.8 kWh चा बॅटरी पॅक आहे, ज्यामुळे ती लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बेस्ट आहे. Mercedes-Benz EQS मध्ये 107.8 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. पॉवरट्रेन ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्स (प्रत्येक एक्सलवर एक), एकूण 523 hp (516 bhp) आणि 855 Nm टॉर्क इतकी पॉवर जनरेट क
advertisement
3/7
या कारचा वेग हा ० ते १०० किमी/तास गाठण्यासाठी फक्त ४.३ सेकंद लागतात. या कारचा टॉप स्पीड तब्बल 210 किमी/तास इतका आहे. ही कार 200 kW DC फास्ट चार्जरने 10-80 चार्ज होण्यासाठी फक्त 31 मिनिट लागतात. तर 11 kW AC चार्जरने पूर्ण चार्जसाठी सुमारे 10 तास लागतात.
advertisement
4/7
कारचे फिचर्स - कारचं डिझाइन अत्यंत एरोडायनॅमिक ‘वन बो’ डिझाइन, जगातील सर्वात कमी ड्रॅग कोएफिशियंट 0.20Cd आहे. डिजिटल LED हेडलॅम्प्स, संपूर्ण रुंदीच्या LED DRL सह आहे. या कारमध्ये 20-इंच एरो अलॉय व्हील्स दिले आहे.
advertisement
5/7
इंटीरियर - कारमध्ये MBUX हायपरस्क्रीन 56-इंच सिंगल-पीस डिस्प्ले, तीन OLED स्क्रीन्ससह (2.3-इंच ड्रायव्हर डिस्प्ले, 17.7-इंच सेंट्रल टचस्क्रीन, 12.3-इंच पॅसेंजर स्क्रीन दिला आहे. पॉवर्ड फ्रंट आणि रीअर सीट्स, व्हेंटिलेशन, हीटिंग आणि मसाज फंक्शनसह दिलं आहे. तसंच कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, रीअर-सीट MBUX टॅबलेट, अँबियंट लायटिंग, दोन वायरलेस चार्जिंग पॅड्स दिले आहे.
advertisement
6/7
विशेष म्हणजे, या कारला Euro NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. तसंच कारमध्ये ६ नव्हे तर 9 एअरबॅग्स दिल्या आहेत, ज्या साइड, विंडो, ड्रायव्हरसाठी एअरबॅग दिली आहे. तसंच लेव्हल 2 ADAS, यामध्ये अॅक्टिव्ह डिस्टन्स असिस्ट, अॅक्टिव्ह ब्रेक असिस्ट (क्रॉस-ट्रॅफिक फंक्शनसह), अॅक्टिव्ह स्टीयरिंग असिस्ट, अटेंशन असिस्ट, लेन कीप असिस्ट, अॅडॅप्टिव्ह हायबीम असिस्ट प्लस दिले आहे.
advertisement
7/7
किंमत किती - Mercedes-Benz EQS 580 4MATIC ही महाराष्ट्रातील पुण्यातल्या चाकण प्लांटमध्ये असेंबल केली जाते, ज्यामुळे किंमत तुलनेने कमी आहे. या कारची किंमत 1.63 कोटी रुपये, एक्स-शोरूम इतकी आहे. बॅटरीवर 8 वर्षे किंवा 2,50,000 किमी वॉरंटी दिली आहे. दर दोन वर्षांनी किंवा 30,000 किमीवर, पहिल्या वर्षासाठी डीलरशिपवर मोफत चार्जिंग सर्व्हिस दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tesla काहीच नाही! पुण्यात तयार होणाऱ्या कारची रेंज तब्बल 857 किमी, मुंबई-पुणे शुन्य खर्चात फिरा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल