TRENDING:

MG: 'ती' आली तिने पाहिलं आणि जिंकलं! आजपर्यंत कुणालाचं जमलं नाही ते या SUV ने केलं!

Last Updated:
बघता बघता या एसयूव्ही मार्केटमध्ये कब्जा केला आहे.  टाटा आणि महिंद्राला Windsor EV ने चांगलीच टक्कर दिली आहे. या एसयूव्हीची विक्री वाढतच चालली आहे त्याच कारण म्हणजे, कंपनीची बॅटरी पॉलिसी. 
advertisement
1/7
MG: 'ती' आली तिने पाहिलं आणि...!आजपर्यंत कुणालाचं जमलं नाही ते या SUV ने केलं!
भारतात सध्या एकापेक्षा एक अशा ईलेक्ट्रिक एसयूव्हीने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. अशीतच काही दिवसांपूर्वी MG मोटर्सने सगळ्यात हटके अशी  Windsor EV लाँच केली होती. बघता बघता या एसयूव्ही मार्केटमध्ये कब्जा केला आहे.  टाटा आणि महिंद्राला Windsor EV ने चांगलीच टक्कर दिली आहे. या एसयूव्हीची विक्री वाढतच चालली आहे त्याच कारण म्हणजे, कंपनीची बॅटरी पॉलिसी. 
advertisement
2/7
MG मोटर्सने बॅटरीसोबत लाइफटाईम वॉरंटी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना रेंजची चिंता आणि मेंटेन्सचं टेन्शन कमी झालं आहे.  कारण, बॅटरी हा इलेक्ट्रिक कारचा सर्वात महागडा भाग असतो. या सर्व कारणांमुळे, ही इलेक्ट्रिक कार भारतातील सर्वात वेगाने विकली जाणारी इलेक्ट्रिक कार बनली. फक्त ६ महिन्यांत २० हजारांहून अधिक ग्राहकांनी ती खरेदी केली आहे.
advertisement
3/7
एमजी मोटर्सने या कारमध्ये लाईफ टाइम बॅटरी वॉरंटी दिली आहे. पहिल्या मालकासाठी लाइफ टाईम बॅटरी वॉरंटी आणि दुसऱ्या मालकासाठी ८ वर्षे किंवा १,६०,००० किमी वॉरंटी दिली आहे
advertisement
4/7
या कारची स्पर्धा ही टाटा मोटर्सची नेक्सॉन ईव्ही, महिंद्रा एक्सयूव्ही४००, ह्युंदाई क्रेटा ईव्ही सारख्या एसयूव्हीशी आहे.
advertisement
5/7
एमजी विंडसर ईव्हीची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 38kWh एलएफपी बॅटरी पॅक आहे. फुल चार्ज केल्यावर ही कार 331 किलोमीटरची रेंज देते. ही कार 136hp पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करते.
advertisement
6/7
नवीन विंडसरमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. यात 135 अंशांच्या रिक्लाइन सीट्स जास्त आकर्षक आहेत. कारच्या सीट्स आरामदायी आहेत. अशा प्रकारच्या सीट्स कोणत्याही कारमध्ये उपलब्ध नाहीत. याशिवाय या कारमध्ये सेगमेंटमधली सर्वांत मोठी 15.6 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आली आहे.
advertisement
7/7
सुरक्षाविषयक फीचर्सबाबत बोलायचं, तर या कारमध्ये सर्वांत जास्त फीचर्स मिळतात. तसंच यात सहा एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम + ईबीडी, हिल होल्ड कंट्रोल, 360 अंशांचा कॅमेरा, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकिंग सिस्टीम, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि डिस्क ब्रेकचा समावेश आहे. डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने बॅटरी केवळ 30 मिनिटांत 30 ते 100 टक्के चार्ज होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
MG: 'ती' आली तिने पाहिलं आणि जिंकलं! आजपर्यंत कुणालाचं जमलं नाही ते या SUV ने केलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल