TRENDING:

Tata ची टँकसारखी SUV अखेर आली, मुंबई-पुणे शुन्य खर्चात फिरा, रेंज तब्बल 500 किमी!

Last Updated:
भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने अलीकडे एकापेक्षा एक ईव्ही कार लाँच करून मार्केटवर आपली पकड मजबूत केली आहे. आता एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने आणखी एक धाकड ईव्ही लाँच केली आहे.
advertisement
1/9
Tata ची टँकसारखी SUV अखेर आली, मुंबई-पुणे शुन्य खर्चात फिरा, रेंज तब्बल 500 किमी
भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने अलीकडे एकापेक्षा एक ईव्ही कार लाँच करून मार्केटवर आपली पकड मजबूत केली आहे. आता एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने आणखी एक धाकड ईव्ही लाँच केली आहे. इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये टाटा मोटर्सने Harrierचं ev व्हर्जन लाँच केली आहे. Harrier EV ची रेंज तब्बल 500 किमी असणार आहे. त्यामुळे MG मोटर्स आणि महिंद्राच्या XEV 9 ला टक्कर देईल.
advertisement
2/9
Harrier EV Active.ev+ आर्किटेक्चरवर तयार केलेली आहे आणि Harrier EV मध्ये सुमारे ५०० किमी रेंज, क्वाड-व्हील-ड्राइव्ह (QWD) ड्युअल-मोटर सेटअप आणि प्रीमियम असे फिचर्स दिले आहे.
advertisement
3/9
Harrier EV ही सेम आधीच्या Harrierवर आधारीत आहे. या ईव्हीमध्ये डीआरएल आणि हेडलॅम्प हे इंटरनल कम्बशन इंजिन (आयसीई) व्हेरियंटसारखेच आहे. या ईव्हीमध्ये नवीन ग्रिल आणि बंपर आहे जे तिला एक वेगळी ओळख देतात. बाहेरून ही एसयूव्ही एक वेगळा लूक देते.
advertisement
4/9
एलईडी डेटाइम रनिंग लाईट (डीआरएल) स्ट्रिप आणि अनोख्या शैलीतील टर्बाइन ब्लेड अलॉय व्हील्ससह एक्सप्रेसिव्ह लाइटिंग एलिमेंट्स हे कारला आणखी धाकड आकर्षक बनवते. लँड रोव्हर D8-आधारित ओमेगा प्लॅटफॉर्मवरून घेतलेल्या मोनोकोक चेसिसवर बनवलेली आणि जग्वार लँड रोव्हरच्या सहकार्याने तयार केली आहे.
advertisement
5/9
Harrier EV मध्ये पॉवर आणि कार्यक्षमता दोन्ही लक्षात घेऊन डिझाइन केलेलं आहे. हॅरियर ईव्हीमध्ये ड्युअल-मोटर सेटअप आहे जे क्वाड-व्हील-ड्राइव्ह देते आणि 500Nm पीक टॉर्क निर्माण करते. ही एसयूव्ही एकदा चार्ज केल्यावर सुमारे ५०० किमी इतकी रिअल ड्रायव्हिंग रेंज देते. ही कार मुळात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे.
advertisement
6/9
Harrier EV च्या बॅटरीबद्दल अजून कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. पण सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर टाटा मोटर्स त्यांच्या ओपन कोलॅबोरेशन २.० उपक्रमाद्वारे भारताच्या इलेक्ट्रिक वाहन इको-सिस्टमला बळकटी देत आहे. चार्ज पॉइंट ऑपरेटर्स (सीपीओ) आणि ऑइल कॉमर्स कंपन्या (ओएमसी) यांच्या भागीदारीत, कंपनी २०२७ पर्यंत सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर ४,००,००० पॉइंट्सपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे.
advertisement
7/9
.२०२० मध्ये Nexon.ev लाँच झाल्यापासून २००,००० हून अधिक इलेक्ट्रिक वाहने विकल्यानंतर, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी भारतातील ईव्ही क्षेत्रात आघाडीवर आहे. हॅरियर ईव्ही, येणाऱ्या सिएरा.ईव्हीसह, टाटाच्या वाढत्या ईव्ही लाइनअपमध्ये सामील होईल, ज्यामध्ये आधीच Tiago.ev, Tigor.ev, Punch.ev, Nexon.ev आणि Curve.ev समाविष्ट आहेत.
advertisement
8/9
हॅरियर ईव्हीमध्ये ड्युअल इलेक्ट्रिक मोटर असेल. तसंच ही एसयूव्ही 60kWh आणि 80kWh बॅटरी ऑप्शनसह मार्केटमध्ये लाँच होईल. फ्रंट व्हील ड्राइव्ह ऑप्शन स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये मिळेल आणि सिंगल मोटर सेटअपसह ती सादर केली जाऊ शकते.
advertisement
9/9
अलीकडेच झालेल्या ग्लोबल मोबिलिटी ऑटो एक्स्पो 2025मध्ये टाटा मोटर्सने हॅरियर या आपल्या लोकप्रिय एसयूव्हीचा इलेक्ट्रिकची झलक दाखवली होती. आता ही एसयूव्ही लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ही एसयूव्ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बेस्ट असा ऑप्शन असणार आहे. मार्केटमध्ये सध्या लांब पल्ल्याच्या प्रवासाठी एमजी मोटर्सने विंडसर प्रो ईव्ही लाँच केली आहे. तर हुंदई आणि महिंद्रानेही आधीच आपल्या एसयूव्ही लाँच केल्या आहेत. त्यामुळे टाटाची हॅरिअर ही चांगलीच टक्कर देईल. टाटा हॅरियरच्या इलेक्ट्रिक कारची किंमत अंदाजे सुमारे 30 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata ची टँकसारखी SUV अखेर आली, मुंबई-पुणे शुन्य खर्चात फिरा, रेंज तब्बल 500 किमी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल