किती दिवस पेट्रोलवर पैसे खर्च करणार? Bike पेक्षा कमी किंमतीत टॉप 7 स्कुटर, 150 किमी नो टेन्शन!
- Published by:sachin Salve
Last Updated:
जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा इलेक्ट्रिक स्कुटर घेतली जात पण त्यानंतर मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो.
advertisement
1/8

वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी ईलेक्ट्रिक वाहनं घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. पहिली गोष्ट म्हणजे स्कुटरची बॅटरी क्षमता आणि चॉर्जिंग क्षमता किती आहे. त्यामुळे कंपन्या आता मजबूत बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची सुविधा देत आहे.
advertisement
2/8
भारतात ओला कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर आणून अख्ख्या मार्केटचा चेहरा बदला. त्यामुळे ओलाची स्कुटरची सर्वात जास्त विक्री होते. अलीकडे ओलाने अपडेटेड मॉडेल लाँच केले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 101 किलोमीटर प्रतितास इतका आहे.
advertisement
3/8
ओलाच्या स्कुटरची बॅटरी रेंज पाहिली तर ही इलेक्ट्रिक स्कुटर एकदा चार्ज केल्यावर 108 किलोमीटर ते 176 किलोमीटर इतकी धावू शकते. या स्कुटरची किंमतही वेगवेगळ्या मॉडेलवर 99 हजारांपासून सुरू होते.
advertisement
4/8
तर दुसऱ्या क्रमांकावर येते हिरो मोटर्सची vida v2. कंपनीने दोन मॉडेल लाँच केले आहे. इलेक्ट्रिक स्कुटरच्या बेस मॉडेलचा 69 किलोमीटर प्रति तास इतका स्पीड आहे. तर बॅटरीची रेंज 94 किलोमीटर असून किंमत 85 हजार रुपये इतकी आहे.
advertisement
5/8
तर हिरो कंपनीने hero vida v2 pro हे टॉप एंड मॉडेलही आणलं आहे. याची किमत 95 हजारांपासून सुरू होते. या स्कुटरचा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रतितास इतका आहे. बॅटरीची रेंज 143 किलोमीटर इतकी आहे.
advertisement
6/8
तिसऱ्या क्रमांकावर येते. होंडा Qc1. कंपनीने 80 किमी इतकी रेंज दिली आहे. या स्कुटरचा टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रतितास इतका आहे. या स्कुटरची किंमत एक्स शोरूम किमत 90 हजार रुपयांपासून सुरू होते.
advertisement
7/8
TVS कंपनीने iQube ही एक दमदार इलेक्ट्रिक स्कूटर हा एक चांगला पर्याय आहे. या स्कुटरला चांगली डिमांड आहे. त्याचं कारण म्हणजे, या स्कुटरचा रेंज १५० किमी इतका आहे. जो इतर स्कुटरपेक्षा जास्त आहे. या स्कुटरची किंमत 1.5 लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
8/8
तर बजाज कंपनीने आपली चेतक स्कुटर कमी किंमत आणि चांगल्या रेंजसाठी ओळखली जातेय. या स्कुटरची सुरुवाती किंमत ही 1.2 लाखांपासून सुरू होते. या स्कुटरची रेंज ही एकदा चार्ज केल्यावर जवळपास 150 किलोमीटर इतकी धावू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
किती दिवस पेट्रोलवर पैसे खर्च करणार? Bike पेक्षा कमी किंमतीत टॉप 7 स्कुटर, 150 किमी नो टेन्शन!