Toyota चा मोठा धमाका, आता फॉर्च्युनर विसरा, येतेय मिनी 'Fortuner', किंमतही कमी!
- Published by:sachin Salve
Last Updated:
दमदार आणि दणकट कार उत्पादन कंपनी म्हणून जपानी टोयोटा कंपनीचा बोलबाला आहे. त्यामुळे जगभरात टोयोटाच्या गाड्यांना मोठी मागणी असते. अशातच आता टोयोटा आपली आणखी एक दमदार अशी एसयूव्ही लाँच करत आहे.
advertisement
1/8

दमदार आणि दणकट कार उत्पादन कंपनी म्हणून जपानी टोयोटा कंपनीचा बोलबाला आहे. त्यामुळे जगभरात टोयोटाच्या गाड्यांना मोठी मागणी असते. अशातच आता टोयोटा आपली आणखी एक दमदार अशी एसयूव्ही लाँच करत आहे. या एसयूव्हीचं नाव हे RAV4 आहे. बुधवारी ही एसयूव्ही जगभरात लाँच होणार आहे.
advertisement
2/8
टोयोटाने नेक्स्ट जनरेशन म्हणून RAV4 ही नवीन एसयूव्ही १ मे रोजी लाँच करणार आहे. RAV4 बद्दल अनेक चर्चा आणि टीझर होते, परंतु आता प्रतीक्षा संपली आहे. लाँचिंगपूर्वी टोयोटाने काही टीझर जारी केले होते. ज्या नवीन RAV4 ची झलक दिसली.
advertisement
3/8
नवीन RAV4 मध्ये खास डिझाइन अपडेट्स आणि नवीन फिचर्स दिले आहेत. RAV4 सध्या तरी भारातीय बाजारात येण्याची शक्यता कमी आहे. पण टोयोटा भविष्यात त्यांच्या लाइनअपमध्ये समाविष्ट करू शकते.
advertisement
4/8
toyota RAV4 मध्ये त्यांचे सिग्नेचर “हॅमरहेड” डिझाइन दिले आहे. यात सी-आकाराचे एलईडी हेडलाइट्स आहेत ज्यात पूर्ण लांबीचा लाइटबार आहे जो एलईडी टेललाइट्ससह एकत्रित केला आहे. जपानी ब्रँडने एसयूव्हीच्या ऑफ-रोड-व्हेईकल समोर ठेवून तयार केली आहे. ज्यामध्ये रूफ रेल, ६-स्पोक ब्लॅक अलॉय व्हील्स आणि मॅट ब्लॅक एलिमेंट्ससह एक मजबूत फ्रंट बंपर आहे.
advertisement
5/8
टोयोटा एक स्पोर्टी जीआर स्पोर्ट प्रकार देखील ऑफर करेल. ज्यामध्ये रॅली-प्रेरित मागील विंग आणि आक्रमक फ्रंट बंपर आणि ग्रिल डिझाइन असेल.
advertisement
6/8
टोयोटा RAV4 मध्ये नवीन लँड क्रूझर प्राडो प्रमाणेच एअर व्हेंट्स डिझाइन, स्टीअरिंग व्हील डिझाइन आणि ऑफ-रोड फोकस्ड इंटीरियर स्टाइलिंग मिळू शकते. यात मोठी स्क्रीन सेटअप, वायरलेस चार्जिंग, नवीन ऑटोमॅटिक क्लायमेट सिस्टम कंट्रोल इत्यादी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
7/8
RAV4 हे TNGA-K आर्किटेक्चरवर आधारित आहे आणि कॅमरीसोबत त्याचे प्लॅटफॉर्म शेअर करते. तर, मुळात, आता RAV4 मध्ये हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेन बसवण्यासाठी जागा आहे.
advertisement
8/8
पॉवरट्रेन पर्यायांमध्ये २.५-लिटर पेट्रोल हायब्रिड इंजिन, २.५-लिटर एनए पेट्रोल इंजिन आणि प्लग-इन हायब्रिडचा समावेश आहे. टोयोटा भविष्यात RAV4 ही इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही लाँच होण्याची शक्यता आहे. या कारची किंमत अमेरिकेमध्ये २९२५० डॉलरपासून भारतीय रक्कमेत 25 लाख 23 हजारापासून सुरू होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Toyota चा मोठा धमाका, आता फॉर्च्युनर विसरा, येतेय मिनी 'Fortuner', किंमतही कमी!