TRENDING:

Toyota Fortuner ची 'ही' SUV आहे कॉर्बन कॉपी, किंमत कमी आणि मायलेजही 28 किमी

Last Updated:
पण ही फॉर्च्युनर विकत घेणे इतकं सोप्प नाही. कारण एक Fortuner  4 व्हील ड्राइव्ह मॉडल खरेदी करण्यासाठी तुम्हाला तब्बल ५० लाख रुपये मोजावे लागतात.
advertisement
1/6
Toyota Fortuner ची 'ही' SUV आहे कॉर्बन कॉपी, किंमत कमी आणि मायलेजही 28 किमी
भारतामध्ये Toyota Fortuner मिरवण्याची अनेकांना हौस असते. नेते मंडळी आणि धनदाड्यांच्या दारात Toyota Fortuner तर हमखास पाहण्यास मिळते. पण ही फॉर्च्युनर विकत घेणे इतकं सोप्प नाही. कारण एक Fortuner  4 व्हील ड्राइव्ह मॉडल खरेदी करण्यासाठी तुम्हाला तब्बल ५० लाख रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सगळ्यांना आपल्या दारात Fortuner उभी करणे हे स्वप्नचं राहुन जातं. अशावेळी तुम्ही टोयोटा कंपनीचीच Fortuner ची कॉर्बन कॉपी दारात आणू शकतात.
advertisement
2/6
तुम्हाला ज्या एसयुव्ही बदल सांगतोय त्या एसयुव्हीचं नाव  Toyota Urban Cruiser Hyryder आहे.  या एसयूव्हीचं डिझाइन हे फॉर्च्युनरवरूनच घेण्यात आलं आहे. एक बोल्ड क्रोम बार सेंटरमध्ये आहे. ज्यावर टोयोटा चा लोगो दिसतो. ब्लॅक फिनिश  हेक्सागोनल ग्रिल एक दमदार लूक दिसतो. शार्प एलईडी हेडलॅम्प आणि एक्सपेंसिव्ह हाउसिंगसह वर्टिकल एलईडी लाइटिंग सिस्टम या एसयूव्हीला वेगळाच लूक देतो.
advertisement
3/6
नवीन एडिशनमध्ये काही नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत. त्यात डोअर वायझर, फ्रंट आणि रीअर बम्पर गार्निश, हेडलॅम्प गार्निश, बॉडी क्लॅडिंग, रिअर डोअर एलआयडी गार्निश आणि डोअर क्रोम हँडल मिळेल. तसंच इंटीरिअरमध्ये थ्रीडी फ्लोअर मॅट, लेगरूम लॅम्प आणि डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डरसारखी फीचर्स देण्यात आली आहेत
advertisement
4/6
ट्रान्समिशनसाठी, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेस फ्रंट-व्हील-ड्राइव्ह आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह कॉन्फिगरेशनसह दिलं आहे. माइल्ड हायब्रिड इंजिनसह CNGचा ऑप्शनही दिला जातो. याच्या स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटमध्ये मायलेज 27.97 किलोमीटर प्रति लिटर आहे. टोयोटाचे हायब्रीड इंजिनमुळे याला सर्वात जास्त मागणी आहे. Honda Elevate आणि Seltos सारख्या नवीन गाड्यांना अद्याप हायब्रिड इंजिन दिलेले नाही.
advertisement
5/6
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये 1.5L लिटर K15C सीरिज इंजिन आहे. त्यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. हे इंजिन 86.63 bhp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन हायब्रिड टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे.
advertisement
6/6
ा कारमध्ये 28 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळतं. तसंच अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये सीएनजी ऑप्शनदेखील देण्यात आला आहे. ही कार सीएनजी मोडवर 27 किलोमीटर प्रति किलो एवढं मायलेज देते. या एसयुव्हीची किंमत जवळपास 20 लाख रुपये एक्स शोरुम इतकी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Toyota Fortuner ची 'ही' SUV आहे कॉर्बन कॉपी, किंमत कमी आणि मायलेजही 28 किमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल