TRENDING:

Golf GTI: अशी कार तिच्यासमोर SUV सुद्धा काहीच नाही! रेसिंगचा नवा किंग, किंमत अखेर जाहीर

Last Updated:
आता यामध्ये जर्मन कंपनीने आणखी एक भर घातली आहे. सेडान कार सेगमेंटमध्ये जर्मन कंपनी फॉक्सवॅगनने गोल्फ GTI (Volkswagen Golf GTI) लाँच केली आहे. ही कार नसून एक रेसिंग कार आहे
advertisement
1/8
Golf GTI: अशी कार तिच्यासमोर SUV सुद्धा काहीच नाही! रेसिंगचा नवा किंग, किंमत...
भारतात सध्या एकापेक्षा एक अशा कार आणि एसयुव्हीने मार्केट व्यापलं आहे. एसयूव्हीमध्ये अनेक पर्याय आहे तर दुसरीकडे सेडान कारमध्येही कमी बजेटपासून ते दमदार फिचर्ससह महागड्या गाड्यांचे पर्यायही उपलब्ध आहे. पण आता यामध्ये जर्मन कंपनीने आणखी एक भर घातली आहे. सेडान कार सेगमेंटमध्ये जर्मन कंपनी फॉक्सवॅगनने गोल्फ GTI (Volkswagen Golf GTI) लाँच केली आहे. ही कार नसून एक रेसिंग कार आहे, असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. कारण, या कारचा टॉप स्पीड हा 250 किमी प्रतितास पेक्षा जास्त आहे.
advertisement
2/8
Volkswagen ने मागील आठवड्यामध्ये भारतात Golf GTI ची घोषणा केली. ही कार एक रेसिंग कारसारखीच आहे. त्यामुळे लाँच केल्यानंतर ५ दिवसांमध्ये 150 गाड्या बुकिंग झाली. लोकांनी अक्षरश: या कारच्या बुकिंगसाठी रांगा लावल्यात. त्यामुळे ग्राहकांच्या आग्रहाखातर आणखी 100 गाड्यांचं उत्पादन केलं जाणार असून त्या भारतातच डिलिव्हर केल्या जाणार आहे. या गाड्यांची डिलिव्हरी 2026 मध्ये होणार आहे. 
advertisement
3/8
Volkswagen Golf GTI ही एक रेसिंग कारची बरोबरी करणारी दमदार अशी कार आहे. या कारच्या केबिनमध्ये  GTI बॅजसहलेदर-रॅप्ड स्पोर्ट्स स्टीयरिंग व्हिल, पॅडल शिफ्टर्स, 12.9-इंच टचस्क्रीन आणि 10.25-इंच ड्रायव्हर डिस्प्ले (VW स्पिक डिजिटल कॉकपिट प्रो) सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
4/8
याशिवाय कारमध्ये 7-स्पिकर साउंड सिस्टिम, वायरलेस चार्जिंग, अम्बिएंट लाइट्स आणि पॅनोरमिक सनरूफ सुद्धा दिला आहे.
advertisement
5/8
जर डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर कारमध्ये  फ्रंट बंपरमध्ये  एक मोठा हनीकॉम्ब पॅटर्नसारखं एअर डॅम दिला आहे. दोन्ही बाजूने  X-साइज फॉग लाइट्स दिले आहे. गोल्फ GTI च्या दारावर  लाल रंगाचा  'GTI' बॅज आहे.
advertisement
6/8
ज्याच्यामध्ये  हेडलॅम्प्स आणि ब्रेक कॅलिपर्स दिले आहे. कारला 18-इंचाचे अलॉय व्हील्स दिले आहे.  यामध्ये मागे स्मोक्ड LED टेल-लाइट्स, एक रूफ स्पॉइलर आणि ट्विन एग्जॉस्ट दिले आहे.
advertisement
7/8
भारतात लाँच झालेल्या Volkswagen Golf GTI मध्ये  2-लिटरचं TSI इंजिन दिलं आहे. जे तब्बल  265bhp इतकी  पॉवर देईल आणि  370Nm चा पीक टॉर्क जनरेट करले.  गोल्फ GTI  0-100kph स्पिड फक्त 5.9 सेकंदात पार करते.
advertisement
8/8
Volkswagen Golf GTI ने भारतीय मार्केटमध्ये एकच वादळ आणलं. कंपनीने सुरुवातील या कारची किंमत गुलदस्त्यात ठेवली होती. अखेरीस कंपनीने ठरल्याप्रमाणे आज २६ मे रोजी अधिकृत घोषणा केली आहे. या कारची किंमत ५३ लाख (एक्स शोरुम ) इतकी जाहीर केली आहे. Volkswagen ची ही भारतातील सर्वात महागडी कार ठरली आहे. पण तरीही या कारला तुफान असा प्रतिसाद आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Golf GTI: अशी कार तिच्यासमोर SUV सुद्धा काहीच नाही! रेसिंगचा नवा किंग, किंमत अखेर जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल