TRENDING:

Toyota ची होती शान, प्रत्येक घरासाठी होती अभिमान; अचानक Innova आली अन् ती बंद झाली!

Last Updated:
काही गाड्या मध्यमवर्गीय फॅमिलीच्या खास राहिल्या तर काही गाड्या डोकेदुखी ठरल्यात. पण टोयाटोची अशी एक ७ सीटर एमपीव्ही होऊन गेली त्या कारला आजही कुणी विसरू शकत नाही.
advertisement
1/8
Toyota ची होती शान, प्रत्येक घरासाठी होती अभिमान; अचानक Innova आली अन् ती बंद झा
फॅमिलीसाठी कार कशी असावी, याचा विचार केला तर मारुती, टाटा आणि टोयोटा यांनी आजपर्यंत अनेक गाड्या लाँच केल्या. काही गाड्या मध्यमवर्गीय फॅमिलीच्या खास राहिल्या तर काही गाड्या डोकेदुखी ठरल्यात. पण टोयाटोची अशी एक ७ सीटर एमपीव्ही होऊन गेली त्या कारला आजही कुणी विसरू शकत नाही. आतमध्ये भरपूर स्पेस, एक काय दोन फॅमिली आरामात बसतील असे सीट्स आणि मायलेजमध्ये दमदार अशी टोयोटाने कार भारतीयांना गिफ्ट केली होती. या कारची क्रेझ इतकी होती की मारुती आणि टाटालाही मोठा धक्का बसला होता. या कारचं नाव आहे toyota qualis
advertisement
2/8
toyota qualis हे नुसतं नाव नव्हतं तर फॅमिली आणि ट्रव्हल्स व्यवसायामध्ये एक विश्वासाचं स्थान होतं. आजही ही गाडी ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती जपून ठेवली आहे. या कारचं इंजिन आणि आतलं इंटिरिअर हे आरामदायक असचं होतं. त्यामुळे ही कार अल्पावधीत हीट झाली. ही फॅमिली एसयूव्ही म्हणून बाजारात लाँच करण्यात आली होती. त्या वेळी महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टाटा सुमोसारख्या कारची कारची विक्री फारशी नव्हती. त्या कार तोट्यात होत्या. त्या वेळी दरवर्षी क्वालिसच्या एक लाख युनिट्सची विक्री होत असे. यावरून तिची लोकप्रियतेचा अंदाज तुम्हाला आला असेल.
advertisement
3/8
टोयोटाने ही कार बंद करण्यामागचं कारण खूप मनोरंजक आहे. टोयोटा क्वालिस 1994मध्ये भारतीय बाजारपेठेत लाँच झाली होती. या कारमध्ये 2.4 लिटर 4 सिलिंडर डिझेल इंजिन होतं. या सात सीटर कारची किंमत त्यावेळी फक्त 4.6 लाख रुपये (एक्स शोरूम) होती. या कारचं इंजिन दमदार असल्याने शहरापासून ते गावापर्यंतच्या सर्व प्रकारच्या रस्त्यांवर चालवण्यास ती योग्य होती.
advertisement
4/8
अभूतपूर्व यश मिळवूनदेखील जागतिक बाजारपेठेत या कारची प्रतिमा डब्बा कार अशी झाली होती. याचं कारण असं, की तिचं डिझाइन बॉक्सी होतं आणि त्या काळी चांगल्या डिझाइनच्या कार बाजारात येऊ लागल्या होत्या.
advertisement
5/8
त्यामुळे अनेक तज्ज्ञ आणि डिझाइन तज्ज्ञांनी या कारच्या डिझाइनमुळे तिला खराब रेटिंग देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या कारचं डिझाइन जुनं झालं असून, ते बंद करून नवीन मॉडेल लाँच करण्याची गरज असल्याचं कंपनीला वाटलं.
advertisement
6/8
बराच विचार केल्यानंतर कंपनीने 2005 मध्ये कंपनीने या कारची शेवटची काही युनिट्स उत्पादित केली आणि त्यानंतर या कारचं उत्पादन बंद केलं. त्यानंतर कंपनीने आपलं सर्वांत लोकप्रिय मॉडेल अर्थात इनोव्हा लाँच केलं.
advertisement
7/8
टोयोटाने इनोव्हा लॉन्च केली, जी आधुनिक डिझाइन आणि नवीन फीचर्ससह सादर झाली. इनोव्हाने क्वालिसची जागा घेतली आणि ती भारतीय बाजारात त्वरित लोकप्रिय झाली. आज इनोव्हा एका वेगळ्या स्थानावर पोहोचली आहे.
advertisement
8/8
पण दमदार इंजिन आणि मजबूत बांधणी अशी टोयोटाच्या वाहनांची ओळख आहे. क्वालिसदेखील फार वेगळी नव्हती. आजही हजारो क्वालिस रस्त्यावर धावत आहेत. काही जण तर मॉडिफिकेशन करून क्वालिस अजूनही वापरत आहेत. पण या कारसारखी गाडी होणे नाही हेही तितकच खरं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Toyota ची होती शान, प्रत्येक घरासाठी होती अभिमान; अचानक Innova आली अन् ती बंद झाली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल