30 दिवसात 22 गुंडांनी केलं आत्मसमर्पण, PM मोदींनीही केलं कौतुक, कोण आहेत हे IPS अधिकारी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
काही पोलीस अधिकारी असे असतात ज्यांचा गुन्हेगारांमध्येही दबदबा असतो. आज अशाच एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांच्याबाबत संपूर्ण पोलीस दलातही एक मानाचे स्थान आहे. गुन्हेगारांनाही त्यांची प्रचंड भीती वाटते. नेमकं हे पोलीस अधिकारी कोण आहेत, हे जाणून घेऊयात. (गुलशन कश्यप, प्रतिनिधी)
advertisement
1/5

उत्तर प्रदेश पोलिसांत आयपीएस सुकीर्ति माधव मिश्रा हे कणखर अधिकारी म्हणून ओळखले जातात. गुन्हेगारांना त्यांची भीती वाटते आणि ज्याठिकाणी त्यांची नियुक्ती असते त्या जिल्ह्यातील गुन्हेगार शहर सोडून जातात.
advertisement
2/5
आयपीएस सुकिर्ती माधव मिश्रा हे मूळचे बिहारचे आहे. ते उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म बिहारमधील जमुई जिल्ह्यातील मलयपूर येथे झाला. ते 2015 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
advertisement
3/5
सुकीर्ती माधव मिश्रा यांचे बालपण अतिशय संघर्षात गेले. त्यांनी सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केले. वडील कृष्णकांत मिश्रा हे हायस्कूलचे शिक्षक आहेत आणि आई कविता मिश्रा गृहिणी आहेत.
advertisement
4/5
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही आयपीएस सुकीर्ती माधव चर्चेत आले होते. 'मैं खाकी हूं...' ही कविता लिहून त्यांनी पोलीस सेवेतील लोकांच्या वेदना मांडल्या होत्या. ही कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि सुकीर्ती माधव चर्चेत आली.
advertisement
5/5
आयपीएस सुकीर्ती माधव मिश्रा यांच्या डॅशिंग कार्यामुळे गुन्हेगारांना त्यांची भीती वाटत होती. ते उत्तरप्रेदशच्या शामली जिल्ह्यात एसपी असताना 30 दिवसांत 22 गुंडांनी पोलीस ठाण्यात पोहोचून आत्मसमर्पण केले. या गुन्हेगारांनी पोलिसांसमोर गुन्ह्यापासून दूर राहण्याची शपथही घेतली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
30 दिवसात 22 गुंडांनी केलं आत्मसमर्पण, PM मोदींनीही केलं कौतुक, कोण आहेत हे IPS अधिकारी