Madhuri Dixit: माधुरीची खोड काढली, हातावर थुंकला; 1862 कोटींच्या सुपरस्टारने अभिनेत्रीला अशी दिली वागणूक
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Madhuri Dixit: बॉलिवूडमध्ये 80-90 च्या दशकात माधुरी दीक्षितचे सौंदर्य आणि अभिनय दोन्हीची जादू होती. लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री जेव्हा सेटवर यायची, तेव्हा सर्वांचे डोळे तिच्याकडेच खिळून राहायचे.
advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये 80-90 च्या दशकात माधुरी दीक्षितचे सौंदर्य आणि अभिनय दोन्हीची जादू होती. लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री जेव्हा सेटवर यायची, तेव्हा सर्वांचे डोळे तिच्याकडेच खिळून राहायचे.
advertisement
2/7
पण एकदा या सौंदर्यसम्राज्ञीला सेटवर इतका राग आला होता की तिने हॉकी स्टिक उचलून तिच्या सहकलाकाराचा पाठलागच केला होता. माधुरीसोबत नेमकं घडलेलं तरी काय?
advertisement
3/7
ही घटना 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘दिल’ या चित्रपटाच्या सेटवरील आहे. या चित्रपटात माधुरीसोबत आमिर खान मुख्य भूमिकेत होता. ‘दिल’ मोठा हिट ठरला, पण त्याच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये एक भन्नाट किस्सा घडला.
advertisement
4/7
आमिर खान हा सेटवर खूप मस्करी करणारा कलाकार म्हणून ओळखला जायचा. त्याला नेहमी मजा करायची सवय होती. एकदा त्याने माधुरीशी एक खेळकर खोडी केली. त्याने माधुरीला सांगितले, “मी हात पाहून भविष्य सांगतो.” भोळ्या मनाने माधुरीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आपला हात पुढे केला. पण अचानक आमिरने तिच्या तळहातावर थुंकले.
advertisement
5/7
क्षणभर माधुरीला काही कळेना, आणि मग तिचा राग अनावर झाला. ती इतकी संतापली की जवळच पडलेली हॉकी स्टिक उचलून आमिरच्या मागे धावू लागली. सेटवरील लोक काही क्षण थबकले आणि मग मोठ्याने हसू लागले. हा किस्सा इतका गाजला की आजही तो चित्रपटसृष्टीतील सर्वात मजेशीर आठवणींपैकी एक मानला जातो.
advertisement
6/7
आमिरने नंतर फरहान अख्तरच्या शोमध्ये या घटनेबद्दल स्वतः कबुली दिली. त्याने सांगितले की अशा प्रकारचा विनोद तो अनेक कलाकारांसोबत करत असे, पण माधुरीला तो अजिबात नकोसा वाटला.
advertisement
7/7
या घटनेनंतरही माधुरी आणि आमिरची जोडी चाहत्यांच्या हृदयात बसली. ‘दिल’ सुपरहिट ठरला आणि माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील नंबर वन हिरोईन म्हणून ओळखली जाऊ लागली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit: माधुरीची खोड काढली, हातावर थुंकला; 1862 कोटींच्या सुपरस्टारने अभिनेत्रीला अशी दिली वागणूक