TRENDING:

Madhurani Gokhale : TV नंतर थेट मोठ्या पडद्यावर! मधुराणीच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट, दिसणार 'या' खास भूमिकेत!

Last Updated:
Madhurani Prabhulkar Gokhale : अभिनेत्री मधुराणी गोखले आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नुकतीच तिने 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत अरुधंती साकारली.
advertisement
1/7
TV नंतर थेट मोठ्या पडद्यावर! मधुराणीच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट
अभिनेत्री मधुराणी गोखले आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नुकतीच तिने 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत अरुधंती साकारली. या मालिकेने तिची लोकप्रियता आणखीनच वाढवली.
advertisement
2/7
आई कुठे काय करते मालिका संपल्यामुळे चाहते तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच मधुराणीने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. तिने तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी चाहत्यांना माहिती दिली.
advertisement
3/7
मधुराणी गोखलेने नुकतीच सौमित्र पोटेंच्या’मित्रम्हणे’ या पॉडकास्ट चॅनेलमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी स्पष्ट मत मांडलं. या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या आगामी प्रोजेक्टविषयीदेखील सांगितलं.
advertisement
4/7
‘आई कुठे काय करते’ ही मालिका मिळण्याअगोदर मधुराणीला आणखी चांगल्या संधी का आल्या नाहीत? तिचा तो काळ कसा होता? यावर तिने भाष्य केलं. आगामी प्रोजेक्टविषयी खुलासा केला.
advertisement
5/7
मधुराणी म्हणाली, 'मी महाराष्टातल्या एका तपस्वीनी दर्जाच्या असलेल्या शास्त्रीय संगीत गायिकेवर चित्रपट बनतोय. आणि त्यांची भूमिका मी करतेय.' तिने शास्त्रीय संगीत गायिकेचं नाव सांगितलं नाही मात्र तिच्या या सरप्राइजमुळे चाहते मात्र तिच्यासाठी फार आनंदी आहेत.
advertisement
6/7
मधुराणी टीव्हीनंतर थेट मोठ्या पडद्यावर दिसणार हे समोर येताच चाहते तिच्यासाठी आनंद व्यक्त करत आहे. त्यामुळे तिचा हा आगामी सिनेमा कधी? कोणावर? आहे याविषयी काही स्पष्टता नाहीये.
advertisement
7/7
दरम्यान, मधुराणी प्रभुलकर गोखलेने आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात नाटकांमधून केली. थिएटरमधील यशानंतर मधुराणीने मराठी मालिकांमध्ये प्रवेश केला. परंतु खरी ओळख त्यांना झी मराठीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेमध्ये तिने अरुंधती ही भूमिका साकारली आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मधुराणी फक्त अभिनेत्रीच नाही, तर उत्तम लेखिका आणि निर्मातीही आहे. तिने काही लघुपटांचे लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhurani Gokhale : TV नंतर थेट मोठ्या पडद्यावर! मधुराणीच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट, दिसणार 'या' खास भूमिकेत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल