Rupali Bhosle: 'तिच्या' एन्ट्रीने प्रेक्षक हादरणार! रुपाली भोसले पुन्हा खलनायिकेच्या भूमिकेत, कोणत्या मालिकेत दिसणार?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Rupali Bhosle New Serial: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय खलनायिका. जिने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रुपाली भोसले आहे. आज ती मराठी टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे.
advertisement
1/7

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय खलनायिका. जिने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रुपाली भोसले आहे. आज ती मराठी टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे.
advertisement
2/7
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले हे नाव आज घराघरात पोहोचले आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत तिने साकारलेली 'संजना' ही नकारात्मक भूमिका प्रचंड गाजली. आता ती पुन्हा एकदा नकारात्मक पात्रासाठी सज्ज झालीय.
advertisement
3/7
अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा एकदा नव्या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करत आहे. तिच्या पुनरागमनाचं वाचून चाहते खूप खूश आहेत. पुन्हा एकदा रुपाली एका खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
4/7
स्टार प्रवाहच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एका टीझर व्हिडिओद्वारे याची झलक दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये एक महिला पाठमोरी चालताना दिसते आणि व्हॉइसओव्हरमध्ये म्हटलं जातं “तुमची आवडती खलनायिका परत येतेय...!”
advertisement
5/7
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. बऱ्याच चाहत्यांनी ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेचं नाव घेतलं आहे. त्यांचा हा गेस बरोबर निघाला.
advertisement
6/7
रुपालीच्या पुनरागमनाची शक्यता आणखी पक्की झाली जेव्हा तिने एका पोस्टमध्ये लिहिलं होतं, “लवकरच काहीतरी भन्नाट घेऊन येतेय… मालिका की नाटक?” यावरूनच चाहत्यांनी अंदाज लावला की तीच पुन्हा छोट्या पडद्यावर खलनायिकेच्या रूपात झळकणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान, ही मालिका कोणती आहे, नेमकी कशावर याचा उत्तर चाहत्यांना उद्या मिळणार आहे. उद्या गुरुवारी, 10 जुलै रोजी प्रोमो रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rupali Bhosle: 'तिच्या' एन्ट्रीने प्रेक्षक हादरणार! रुपाली भोसले पुन्हा खलनायिकेच्या भूमिकेत, कोणत्या मालिकेत दिसणार?