निम्रत कौरसोबत अफेअरच्या चर्चा, अभिषेक बच्चनची पहिली पोस्ट; म्हणाला, 'मला बोलायचं...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
abhishek bachchan first post after affair rumors : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निम्रत कौर यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू असताना अभिनेत्याची पहिली पोस्ट समोर आली आहे. अभिषेकची पोस्ट नक्की काय आहे?
advertisement
1/7

अभिनेता अभिषेक बच्चनचं नाव अभिनेत्री निम्रत कौरसोबत जोडण्यात आलं आहे. ऐश्वर्याला घटस्फोट देऊन अभिषेक बच्चन निम्रत कौरला डेट करत असल्याचंही म्हटलं जात आहे.
advertisement
2/7
मागील काही महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या डिवोर्सच्या चर्चा रंगलेल्या असताना मध्येच अभिषेक आणि निम्रत कौरच्या अफेअरच्या चर्चा समोर आल्यात.
advertisement
3/7
निम्रत कौरबरोबर अफेअर्सच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनची पहिली सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे.
advertisement
4/7
"मला बोलायचं आहे", असं म्हणत अभिषेकने ही पोस्ट शेअर केली आहे. अभिषेकची ही पोस्ट अल्पावधीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
advertisement
5/7
या पोस्टमध्ये अभिषेकने पुढे लिहिलंय,"आपण सगळे अशा एका व्यक्तीला ओळखतो जो बोलण्यासाठी जगतोय."
advertisement
6/7
"ही एका अशा व्यक्तीची गोष्ट आहे नेहमी आयुष्याच्या उज्वल बाजूकडे पाहतो. मग त्याच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी."
advertisement
7/7
अभिषेकची ही पोस्ट त्याच्या सिनेमाच्या संदर्भातील आहे. I Want To Talk असं त्याच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा 22 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
निम्रत कौरसोबत अफेअरच्या चर्चा, अभिषेक बच्चनची पहिली पोस्ट; म्हणाला, 'मला बोलायचं...'