TRENDING:

"मला नग्न झाल्यासारखं वाटत होतं!" नवरा म्हणाला, 'अशा नजरेने बघू...' अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Last Updated:
Bollywood Actress: आजकाल पडद्यावर बोल्ड सीन्स आणि तोकडे कपडे अगदी सहज दिसतात. पण 80-90 च्या दशकांत असे कपडे घालणे, इंटीमेट सीन्स देणे खूप मोठी गोष्ट होती आणि हे सहसा दिसायचे नाहित.
advertisement
1/7
"मला नग्न झाल्यासारखं वाटत होतं!" अभिनेत्रीचा नवरा म्हणाला, 'अशा नजरेने बघू...'
आजकाल पडद्यावर बोल्ड सीन्स आणि तोकडे कपडे अगदी सहज दिसतात. पण 80-90 च्या दशकांत असे कपडे घालणे, इंटीमेट सीन्स देणे खूप मोठी गोष्ट होती आणि हे सहसा दिसायचे नाहित. त्या काळातही अभिनेत्रींसोबत अनेक धक्कादायक प्रकार घडायचे जे आजही घडतात.
advertisement
2/7
अशीच एक घटना अभिनेत्रीसोबत घडली. या अभिनेत्रीचं नाव आहे मौसमी चॅटर्जी. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेभीने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेविषयी सांगितलं.
advertisement
3/7
एका मोठ्या संधीने तिच्या दारावर दस्तक दिली... हृषिकेश मुखर्जींसारख्या दिग्दर्शकाच्या 'गुड्डी' चित्रपटात मुख्य भूमिका! पण या भूमिकेची अट ऐकून मौसमी पुरती गोंधळली. तिला घालायचा होता शॉर्ट स्कर्ट. तेव्हा ती फक्त 13 वर्षांची होती. जिने नुकतीच साडी नेसायला सुरुवात केली होती. तिच्यासाठी हे खूप कठिण होतं त्यामुळे तिने दिग्दर्शकाला नकार दिला.
advertisement
4/7
मौसमीचा नकार ऐकून हृषिकेश मुखर्जींचा पारा चढला. त्यांनी तिला करिअर संपवण्याची धमकी दिली. पण मौसमी तेव्हा फिल्मी दुनियेत करिअर करण्याच्या विचारात नव्हती, त्यामुळे तिने या धमकीला फार गांभीर्याने घेतलं नाही.
advertisement
5/7
मात्र काही वर्षानंतर दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं. तलाश मालिकेत दोघांनी सोबत काम केलं. मात्र तेव्हाही तिने अट ठेवली होती. "मी रविवारी काम करणार नाही! तो दिवस माझ्या मुलींसाठी राखीव आहे!" हृषिकेशजींना तिची ही अट ऐकून आश्चर्य वाटलं, पण त्यांनी तिच्या निर्णयाचा आदर केला.
advertisement
6/7
मौसमीने तिच्या भूतकाळातील आणखी एक आठवण सांगितली, "एकदा एका चित्रपटासाठी मला बॅकलेस ब्लाउज आणि शॉर्ट स्कर्ट देण्यात आला होता. ती वेशभूषा बघून मी इतकी अस्वस्थ झाले की अक्षरशः रडायला लागले. मला वाटलं, मी नग्न आहे!"
advertisement
7/7
मौसमीने पुढे सांगितलं तेव्हा माझ्या नवऱ्याने समजावलं, "मौसमी, हे अभिनयाचं क्षेत्र आहे. कपड्यांकडे तू अशा नजरेनं पाहू नकोस. हे तुझं काम आहे"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"मला नग्न झाल्यासारखं वाटत होतं!" नवरा म्हणाला, 'अशा नजरेने बघू...' अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल