TRENDING:

ऑडिशनसाठी हॉटेलमध्ये बोलावलं, जबरदस्तीने मिठी मारली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर प्रकार

Last Updated:
Actress : अभिनेत्रीचा काही वर्षांपूर्वी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. ऑडिशनसाठी बोलावून अभिनेत्याने अभिनेत्रीवर जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाचा अभिनेत्रीला मानसिक त्रास झाला होता.
advertisement
1/6
जबरदस्तीने मिठी मारली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर प्रकार
नरविनी डेरी ही दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक तमिळ चित्रपटांत तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. पण सात वर्षांपूर्वी नरविनी कास्टिंग काऊचची शिकार झाली होती.
advertisement
2/6
'ट्रेंड टॉक्सी' या तमिळ युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नरविनीने दाक्षिणात्य सुपरस्टार अजमल अमीरसोबत गंभीर आरोप केले होते. ऑडिशनच्या नावाखाली तिला बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.
advertisement
3/6
नरविनी म्हणाली,"अजमल अमीरने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण नशिबाने मी वाचले. 2018 मध्ये चेन्नईतील एका मॉलमध्ये अजमल अमोरसोबत माझी पहिली भेट झाली होती. त्यावेळी आपल्या आगामी चित्रपटासाठी तो नायिका शोधत असल्याचं सांगून त्याने माझ्याकडून माझा संपर्कक्रमांक मागितला. पुढे व्हॉट्सअॅपवर मेसेज करत त्याने मला ऑडिशनसाठी तात्काळ यायला सांगितले. त्यावेळी मी डेन्मार्कला जाण्याची तयारी करत होते. फ्लाइट असूनही मी ऑडिशनला जाण्याचा निर्णय घेतला. अजमाल इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा असल्याने मला भीती वाटली नाही".
advertisement
4/6
नरविनी पुढे म्हणाली,"अजमलने मला त्यावेळी ऑडिशनसाठी जे लोकेशन पाठवले होते ते फार परिचित नसलेल्या हॉटेटचे होते. तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्यामुळे मी घाबरतच त्या हॉटेलवर पोहोचले. दरम्यान मैत्रिणीला मेसेज केला होता की,"20 मिनिटांत माझा मेसेज आला नाही तर मला फोन कर". हॉटेलवर पोहोचल्या पोहोचल्या अजमलने माझा हात हातात धरुन नाचायला सुरुवात केली. त्यानंतर त्याचा हेतू माझ्या लक्षात आला आणि मी लगेच माझा हात सोडवला".
advertisement
5/6
या घटनेनंतरही अजलम नरविनीला सतत मेसेज पाठवत राहिला आणि पुन्हा भेटू शकतो का असे विचारत राहिला.
advertisement
6/6
नरविनीने त्यावेळी शिक्षण आणि करिअरमुळे पोलीस तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतला. पण आता सात वर्षांनी तिने हा प्रकार जाहिरपणे सांगितला आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.'सिनमकोल’ आणि ‘उयिरवराय इनिथाय’ या चित्रपटांत नरविनी मुख्य भूमिकेत झळकली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऑडिशनसाठी हॉटेलमध्ये बोलावलं, जबरदस्तीने मिठी मारली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल