80s मध्ये एका लिप किसने उडवली खळबळ, वयाच्या 20व्या वर्षी प्रेग्नंट झाली अभिनेत्री; लोक आजही Google वर शोधतात नाव
- Published by:Minal Gurav
Last Updated:
80च्या दशकातील एक बोल्ड बिनधास्त अभिनेत्री जी अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. तिच्या एका लीप सीनमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. ती आजही इतकी फेमस आहे की लोक तिचं नाव गुगलवर सर्च करतात.
advertisement
1/9

हिंदी सिनेमात आज अनेक ग्लॅमरस अभिनेत्री आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री केवळ साडीत दिसायच्या असा काळात एका अभिनेत्रीनं लिप किस सीन देत खळबळ उडवली होती. या अभिनेत्री पर्सनल लाइफही चर्चेत आली होती. अभिनेत्री वयाच्या 20 व्या वर्षी प्रेग्नंट झाली होती. या अभिनेत्रीचं नाव आजही लोक गुगलवर शोधतात.
advertisement
2/9
70-80 च्या दशकातील अनेक अभिनेत्री आजही सिनेमात सक्रीय आहेत. पण अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या कारकीर्दीत प्रचंड लोकप्रियता मिळवली. पण फार लवकर त्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर गेल्या.
advertisement
3/9
या अभिनेत्रीनं तिच्या काळात खूप नाव कमावलं. तिच्या एका सीने चांगलाच खळबळ उडवली होती. आज ही अभिनेत्री 53 वर्षांची आहे. ती आता काय करते?
advertisement
4/9
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे सोनम बख्तावर. तिचा जन्म 2 डिसेंबर 1972 साली मुंबईच्या वांद्रे येथे झाला. वयाच्या 16 व्या वर्षी तिनं सम्राट या 'तेलुगु' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
advertisement
5/9
माधुरी दीक्षित, जूही चावला आणि श्रीदेवी सारख्या अभिनेत्री जेव्हा नावारूपाला आल्या होत्या त्या काळात या अभिनेत्रीनं तिच्या अभिनयानं आणि एका बोल्ड सीननं चांगलीच खळबळ उडवून दिली होती.
advertisement
6/9
आपल्या ग्लॅमरस पर्सनॅलिटीमुळे सोनमने इंडस्ट्रीमध्ये आणि प्रेक्षकांच्या मनात आपली एक नवी ओळख निर्माण केली. सोनम तिच्या बोल्ड लुक्स आणि बिकिनी अपीयरेन्समुळे नेहमीच चर्चेत राहिली. मिट्टी और सोना या सिनेमामुळे ती रातोरात स्टार बनली. अजूबा या सिनेमात तिने ऋषी कपूरबरोबर लिप लॉक सीन दिला होता. त्या काळात हा खूप बोल्ड सीन समजला गेला होता. या सिनेमानंतर सोनमची प्रसिद्ध खूप वाढली पण तिची अभिनय कारकीर्द फार काळ टिकू शकली नाही.
advertisement
7/9
सोनमने 1987 ते 1994 सालापर्यंत इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून काम केलं. या काळात तिने जवळपास 30-35 सिनेमात काम केलं. वयाच्या 20 व्या वर्षी सोनम प्रेग्नंट राहिली. त्यानंतर तिने लग्न केलं आणि कायमची विदेशात सेटल झाली.
advertisement
8/9
त्रिदेव सिनेमाचा डायरेक्टरबरोबर ती लाँग टर्म रिलेशनमध्ये होती. त्याच्याबरोबरच तिनं लग्न केलं. 2016 मध्ये दोघांचा डिवोर्स झाला. पण सोनम मोठ्या पडद्यावरून अचानक गायब झाल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.
advertisement
9/9
1994 साली इंसानियत या सिनेमात सोनम शेवटची दिसली होती. त्यानंतर ती कुठेच दिसली नाही. सिनेमापासून दूर असली तरी सोनम सोशल मीडियावर सक्रीय असते. तिथे तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. मिडिया रिपोर्टनुसार सोनम 650 कोटींची मालकीण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
80s मध्ये एका लिप किसने उडवली खळबळ, वयाच्या 20व्या वर्षी प्रेग्नंट झाली अभिनेत्री; लोक आजही Google वर शोधतात नाव