मुंबई HIV च्या विळख्यात! महिन्याला 50 बळी, 150 नवे रुग्ण; World Aids Day लाच आला धक्कादायक रिपोर्ट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mumbai HIV Report : आज जागतिक एड्स दिन. त्यानिमित्ताने मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटीने मुंबईतील एक डेटा जारी केला आहे. ज्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
1/5

1 डिसेंबर जागतिक एड्स दिन... या दिवशीच मुंबईतील एचआयव्हीची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मुंबई एचआयव्हीच्या विळख्यात आहे. महिन्याला 150 रुग्ण सापडत आहेत. तर 50 बळी जात आहेत.
advertisement
2/5
मीडिया रिपोर्टनुसार वर्ल्ड एड्स डेच्या निमित्ताने मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटीने (MDACS) मुंंबईतील एचआयव्हीचा रिपोर्ट जारी केला. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
3/5
गेल्या वर्षभरात एचआयव्ही ग्रस्त 12039 रुग्णांवर आजीवन उपचार सुरू करण्यात आले. ज्यामुळे मुंबईत अँटीरेट्रोव्हायरल थेरपी घेणाऱ्यांची संख्या 52697 वर पोहोचली आहे. पण शहरात 62571 एचआयव्ही ग्रस्त रुग्ण आहेत.
advertisement
4/5
वर्षाला शहरात 3000 नवीन प्रकरणं नोंदवली जात आहेत. या वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर 302579 लोकांची टेस्ट झाली होती. त्यापैकी 1538 नवीन इन्फेक्शन नोंदवली गेली आहेत.
advertisement
5/5
तर 2021 पासून 4571 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यापैकी 491 रुग्ण या वर्षी ऑक्टोबरपर्यंत झाले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मुंबई HIV च्या विळख्यात! महिन्याला 50 बळी, 150 नवे रुग्ण; World Aids Day लाच आला धक्कादायक रिपोर्ट