TRENDING:

'आई-बाबांच्या विरोधकांनी त्रास दिला, करिअर संपवलं...' अंजिक्य देव स्पष्टच बोलले

Last Updated:
अभिनेते अजिंक्य देव हे स्टारकिड असून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अजिंक्य देव यांनी नेपोटिझमवर भाष्य केलं.
advertisement
1/9
'आई-बाबांच्या विरोधकांनी त्रास दिला, करिअर संपवलं...' अंजिक्य देव स्पष्टच बोलले
हिंदी सिनेसृष्टी असो किंवा मराठी नेपोटिझम हा विषय चर्चेत असतोच. अनेक कलाकारांवर नेपोटिझमचा आरोप केला होता. स्टारकिड्स म्हणजे त्यांना सगळं सहज मिळालं असावं असा अनेकांचा समज असतो. प्रसिद्ध अभिनेते अंजिक्य देव यांनी यावर भाष्य केलं.
advertisement
2/9
अजिंक्य देव हे दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे चिरंजीव आहेत. वडील रमेश देव आणि आई सीमा देव यांच्या अभिनयाचा वारसा अजिंक्य देव पुढे चालवत आहेत. अजिंक्य देव यांचा असा मी तशी मी आणि 120 बहादूर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं मुलाखतीत बोलताना अजिंक्य देव यांनी नेपोटिझमवर भाष्य केलं.
advertisement
3/9
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अजिंक्य देव म्हणाले,  "बऱ्याच प्रेक्षकांना वाटतं की आम्ही वारसा घेऊन आलोय, आमची फॅमिली इंडस्ट्रीमध्ये आहे, आमच्यासाठी हे खूप सोपं आहे. तुम्हाला काय, आम्हाला स्ट्रगल करावा लागला असं म्हणतात. पण ते सगळं चुकीचं आहे."
advertisement
4/9
 "खरा स्ट्रगल आमचा असतो. ती लिगसी आम्हाला खांद्यावर एक खूप मोठं ओझं घेऊनच इंडस्ट्रीत पाठवते. मला त्या लीगसीचा प्रचंड त्रास झाला. माझ्या विरोधकांनी त्रास दिला, बाबांच्या आणि आईच्या विरोधकांनी त्रास दिला. ज्यांचे त्यांच्याबरोबर हेवेदावे होते ते सगळे त्यांनी माझ्यावर काढण्याचा प्रयत्न केला. हे सगळं मला फेस करावं लागलं. जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर तुम्हाला उभं राहावं लागतं आणि त्यातून तुम्हाला तुमचा मार्ग काढावा लागतो आणि तो खूप कठीण आहे."
advertisement
5/9
"लोकांना असं वाटत असतं की तुम्हाला दार उघडं आहेत, करेक्ट आहे, आम्हाला फक्त पहिलं दार उघडं आहे तेही आपल्या लिगसीमुळे. त्याच्यानंतरची सगळी दार आम्हाला खूप कठीणाईने पार करावी लागतात. जर तुमच्या मागे लीगसी नसेल तर तुमच्यासाठी ते खूप सोपं आहे कारण तुम्हाला लगेच स्वीकारलं जातं. पण आमच्याकडे असं होतं की, अरे बाबा तर इतके मोठे अभिनेते, आई इतकी सुंदर एक्ट्रेस... जमत नाही त्याचं राजकारण केलं जातं. छोटी इंडस्ट्री असली तरी प्रत्येकाचे हेवे दावे असतात."
advertisement
6/9
इंडस्ट्रीत नेपोटिझम आहे असं म्हणतात, यावर बोलताना अजिंक्य देव म्हणाले, "हे खूप पक्षपाती आहे असं मला वाटतं. कारण नसतानाचं वादळ निघालं आहे की नेपोटिझम आहे. नेपो किड्स सगळ्यात जास्त सफर होतात. आम्हाला जे सफरिंग करावं लागतं ते तुम्हाला माहितीच नाही. मी आजही त्या पाथवर येण्यासाठी स्ट्रगल करतोय."
advertisement
7/9
"माझ्या वडिलांनी आणि आईने जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांच्या मागे काही नव्हती. त्यांनी त्यांचं वलय निर्माण केलं. त्या वलयात मी कुठे तरी हरवलो. आजही बाहेर पडलो की लोक मला म्हणतात की, हा बघा रमेश देवचा मुलगा. मला त्याचा अभिमान आहे. पण ते वजन आहे आणि ते राहणार आहे."
advertisement
8/9
अजिंक्य देव यांनी त्यांच्या भावाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले "माझा भाऊ अभिनय तो तो आमच्या फिल्डमध्ये असला तरी त्याने जाहिरातीपासून सुरूवात केली. तो डायरेक्शनमध्ये गेला  त्याला त्याचा इतका फटका बसला नाही. कारण तो एक्टिंगपासून दूर होता. पण माझ्यासाठी ते खूप कठिण होतं."
advertisement
9/9
अजिंक्य देव पुढे म्हणाले, "मला वारंवार सिद्ध करावं लागलं आजही सिद्ध करतो की मीही आहे. मला असं वाटतं की, हा प्रवास आहे. लोकांना जे दिसत नाही, आणि ते बोलतात. त्यांना वाटतं आम्हाला सगळं आरामात मिळतं, तर आम्हाला काही आरामात मिळत नाही. खूप कष्ट केलेत."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आई-बाबांच्या विरोधकांनी त्रास दिला, करिअर संपवलं...' अंजिक्य देव स्पष्टच बोलले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल