OTT Best Mystrey Thriller : ओटीटीची जबरदस्त क्राइम सीरिज, प्रत्येक एपिसोडमध्ये शॉकिंग सस्पेन्स, क्लायमॅस पाहून हादरून जाल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
OTT Best Mystrey Thriller : आज आम्ही तुम्हाला एका अशा जबरदस्त वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत, ज्याची कथा तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली किंवा ऐकली नसेल! पहिल्याच एपिसोडपासून मिस्ट्री सुरू होते आणि शेवटपर्यंत ते कायम राहते.
advertisement
1/8

मुंबई: आज आम्ही तुम्हाला एका अशा जबरदस्त वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत, ज्याची कथा तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली किंवा ऐकली नसेल! पहिल्याच एपिसोडपासून मिस्ट्री सुरू होते आणि शेवटपर्यंत ते कायम राहते. आम्ही ज्या सीरिजबद्दल बोलत आहोत, तिचे नाव आहे 'सेल १४५' (Cell 145), जी हिंदीमध्ये 'कारागार' नावाने उपलब्ध आहे.
advertisement
2/8
ही २०२२ मध्ये आलेली बांगलादेशी सीरिज आहे, जी तुमच्या डोक्यात विचारचक्र सुरू करेल. ही कथा एका मध्यवर्ती कारागृहाभोवती फिरते.
advertisement
3/8
जेलमध्ये एकूण ३२५ कैदी असतात आणि रोज संध्याकाळी त्यांची मोजणी होते. मात्र, एका संध्याकाळी जेव्हा मोजणी होते, तेव्हा प्रशासनाला धक्का बसतो. कैद्यांची संख्या ३२५ वरून अचानक ३२६ झाली आहे!
advertisement
4/8
हा अतिरिक्त कैदी येतो कुठून, तर तो थेट 'सेल नंबर १४५' मध्ये! हा सेल गेल्या ५० वर्षांपासून बंद होता. ही बातमी जेल प्रशासनाला कळताच एकच गोंधळ उडतो. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो की, हा नवीन कैदी बंद असलेल्या सेलमध्ये आत कसा आला? काही कैदी त्याला 'अवतार' मानून त्याची जेलमध्येच पूजा करायला सुरुवात करतात.
advertisement
5/8
विशेष म्हणजे, हा कैदी बोलू शकत नाही. तो फक्त साइन लँग्वेजमध्ये बोलतो. चौकशीदरम्यान, हा कैदी जो खुलासा करतो, तो ऐकून जेल प्रशासनाचे होशच उडतात.
advertisement
6/8
हा कैदी सांगतो की, त्याने एका व्यक्तीची हत्या केली होती आणि याच कारणामुळे तो गेल्या २५० वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे! यानंतर सीरिजच्या कथानकात एकामागोमाग एक जबरदस्त आणि अनपेक्षित ट्विस्ट येतात.
advertisement
7/8
'सेल १४५' सीरिजचा क्लायमॅक्स अत्यंत भावनिक आणि धक्कादायक आहे. ही सीरिज अमेझॉन प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
advertisement
8/8
या सीरिजचे दोन सिझन असून, त्यात एकूण १४ एपिसोड्स आहेत. या सीरिजला आयएमडीबीवर १० पैकी ८.२ इतके जबरदस्त रेटिंग मिळाले आहे. चंचल चौधरी यांनी यात मुख्य भूमिका साकारली आहे. सईद अहमद यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Best Mystrey Thriller : ओटीटीची जबरदस्त क्राइम सीरिज, प्रत्येक एपिसोडमध्ये शॉकिंग सस्पेन्स, क्लायमॅस पाहून हादरून जाल