TRENDING:

Amitabh Bachchan Real Surname : अमिताभ 'बच्चन' नाहीये, बिग बींचं खरं आडनाव माहितीये का?

Last Updated:
Amitabh Bachchan Real Surname : बच्चन म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा बिग बी अमिताभ बच्चनच डोळ्यांसमोर येतात. बच्चन म्हणजेच अमिताभ हे समीकरण झालं. पण तुम्हाला माहिती आहे का बच्चन हे अमिताभ यांचं खरं आडनाव नाहीये.
advertisement
1/9
अमिताभ 'बच्चन' नाहीये, बिग बींचं खरं आडनाव माहितीये का?
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन वयाच्या 80व्या वर्षीही त्याच ताकदीनं काम करत आहेत. सध्या ते कौन बनेगा करोडपतीमधून टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
advertisement
2/9
अमिताभ बच्चन यांचा अभिनय, त्यांची शैली आणि व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांची एक वेगळी ओळख आहे. आणि त्यांची दुसरी ओळख ही त्यांच्या आडनावामुळे देखील आहे.
advertisement
3/9
बच्चन म्हटलं की पहिल्यांदा बिग बी अमिताभ डोळ्यांसमोर येतात. पण तुम्हाला माहिती आहे का बच्चन हे अमिताभ यांचं खरं आडनाव नाहीये.
advertisement
4/9
बिग बींचं खरं आडनाव श्रीवास्तव असं आहे. त्यांच्या आडनावामागे फार रंजक स्टोरी आहे. अमिताभ श्रीवास्तवचे बच्चन कसे झाले पाहूयात.
advertisement
5/9
अमिताभ बच्चन यांनी एकदा KBCमध्ये स्वतःच त्यांच्या आडनावामागची स्टोरी सांगितली होती. त्यांचं मूळ आडनाव हे श्रीवास्तव आहे. त्यांचे वडील प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन यांनी जातिवादावर विश्वास ठेवत नसल्यामुळे त्यांचे आडनाव बदलले.
advertisement
6/9
अमिताभ म्हणाले होते, "आमच्या आडनावावरून तुम्ही आमची जात ओळखू शकणार नाही. आमच्या बाबूजींनी हे जाणूनबुजून केलं होतं."
advertisement
7/9
"बाबूजी उत्तर प्रदेशातील कायस्थ कुटुंबातील होते.  त्यांनी आमच्या मातोश्रींशी म्हणजेच एका शीख कुटुंबातील महिलेशी लग्न केलं."
advertisement
8/9
बिग बी पुढे म्हणाले, "जेव्हा माझ्या शाळेत प्रवेश घेण्याची वेळ आली आणि त्यांना विचारण्यात आलं की आडनाव काय लिहायचं, तेव्हा त्यांनी 'श्रीवास्तव'च्या ऐवजी 'बच्चन' लिहिलं. पहिल्यांदाच त्यांनी त्यांचं टोपणनावच आडनाव म्हणून वापरलं."
advertisement
9/9
बिग बींनी सांगितलं, "माझे वडील जातीवादावर विश्वास ठेवत नव्हते. ते कधीच जातपात मानत नव्हते. म्हणूनच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी या कुटुंबातील पहिला सदस्य आहे जो 'बच्चन' आडनाव घेऊन जन्माला आलो आणि मोठा झालो."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Amitabh Bachchan Real Surname : अमिताभ 'बच्चन' नाहीये, बिग बींचं खरं आडनाव माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल