TRENDING:

सनी लिओनीचा क्राइम थ्रिलर सिनेमा, ज्याला कान्समध्ये 7 मिनिटांचं स्टँडिंग ओव्हेश; भारतात अजूनही नाही झाला रिलीज

Last Updated:
सनी लिओनी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाइलमुळे ओळखली गेली आहे. पण सनीने अनेक थ्रिलर सिनेमांमध्येही काम केलं आहे. तिचा असाच एक क्राइम थ्रिलर सिनेमा आहे ज्याला कान्स फेस्टिव्हलमध्ये 7 मिनिटांचं स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं. पण हा सिनेमा अद्याप भारतात रिलीज झालेला नाही. 
advertisement
1/7
सनी लिओनीचा क्राइम थ्रिलर सिनेमा, कान्समध्ये मिळालं 7 मिनिटांचं स्टँडिंग ओव्हेश
या सिनेमात सनी लिओनी आणि राहुल भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुराग कश्यपने हा सिनेमा दिग्दर्शिक केला होता. या सिनेमाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 7 मिनिटांचा स्टँडिंग ओव्हेशन मिळालं.
advertisement
2/7
आपण ज्या सिनेमाविषयी बोलतोय तो सिनेमा म्हणजेच केनेडी. 2023 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'केनेडी'ने जबरदस्त ग्लोबल डेब्यू केला. तिथे तो मिडनाईट स्क्रीनिंग विभागात रिलीज झाला.
advertisement
3/7
कान्समधील यशानंतर 'केनेडी' ने त्याचा आंतरराष्ट्रीय महोत्सव प्रवास सुरू ठेवला. सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो दाखवण्यात आला आहे. या महोत्सवात प्रेक्षकांनी स्टँडिग ओव्हेशन देऊन सिनेमाचं कौतुक केलं. युरोपाबाहेरही या सिनेमाला लक्षणीय प्रतिसाद मिळाला.
advertisement
4/7
'केनेडी' हा सिनेमा जिओ मामी फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखवला गेला. भारतातही एक मोठं व्यासपीठ मिळालं. भारतीय प्रेक्षकांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहण्याची संधी मिळाली. अनुराग कश्यपच्या धाडसी कथाकथन आणि खास सीन्सची पुन्हा चर्चा सुरू झाली.
advertisement
5/7
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर दाखवण्यात आलेला असूनही 'केनेडी' अद्याप भारतात थिएटरमध्ये रिलीज झालेला नाही. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. याचं नेमकं कारण काय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.  
advertisement
6/7
 बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार हा थ्रिलर सिनेमा पुढील एक-दोन महिन्यांत मोठ्या पडद्यावर येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान सिनेमाच्या रिलीजबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
advertisement
7/7
असा दावा करण्यात आला आहे की, निर्मात्यांनी ट्रेलर लाँचसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म फायनल केला आहे. काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हल 2026 वेबसाइटवर अपलोड केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, 'केनेडी'चा ट्रेलर रविवार 8 फेब्रुवारी रोजी मुंबईतील क्रॉस मैदानावर लाँच केला जाईल. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सनी लिओनीचा क्राइम थ्रिलर सिनेमा, ज्याला कान्समध्ये 7 मिनिटांचं स्टँडिंग ओव्हेश; भारतात अजूनही नाही झाला रिलीज
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल