Arbaaz Khan : अरबाज खानने 57व्या वर्षी केलं दुसरं लग्न, PHOTO केले शेअर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मलायका अरोराशी घटस्फोट घेतल्यानंतर ६ वर्षांनी अरबाज खानने दुसरं लग्न केलं. या लग्नसोहळ्याला सलमान खानही उपस्थित होता.
advertisement
1/5

बॉलिवूड अभिनेता अरबाझ खानने दुसऱ्यांदा लग्न केलं असून शूरा खानसोबत बहीण अर्पिताच्या घरी हा सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात कुटुंबिय आणि काही जवळचे लोक सहभागी होते.
advertisement
2/5
मलायका अरोराशी घटस्फोट घेतल्यानंतर ६ वर्षांनी अरबाज खानने दुसरं लग्न केलं. या लग्नसोहळ्याला सलमान खानही उपस्थित होता.
advertisement
3/5
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहानसुद्धा अर्पिताच्या घरी पोहोचला होता. याशिवाय रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, बाबा सिद्दीकी, सलमा खान, हर्षदीप कौर, युलिया वंतूर हेसुद्धा पोहोचले होते.
advertisement
4/5
अरबाज आणि शूरा यांचं लग्न साध्या पद्धतीने पार पडलं. जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअपनंतर शूरा खानला अरबाज डेट करत होता. काही दिवसांपूर्वीच अचानक त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. दोघांच्या रिलेशनशिपबाबत मात्र चर्चा नव्हती.
advertisement
5/5
अरबाज आणि मलायका यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे. अरबाजसोबत घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Arbaaz Khan : अरबाज खानने 57व्या वर्षी केलं दुसरं लग्न, PHOTO केले शेअर