प्रसिद्ध मराठी अभिनेता, ज्याने ऐश्वर्या रायसाठी बनवला होता सोन्याचा लेहंगा, 3.5 किलोचा नेकलेस आणि 13 ज्वेलरी सेट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कोण आहे हा मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक ज्याने ऐश्वर्या रायसाठी सोन्याचा लेहंगा, 3.5 किलोचा नेकलेस बनवला होता. पण कशासाठी?
advertisement
1/8

ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडची एक अशी स्टार आहे जिच्या अभिनयाची आणि त्याहून जास्त तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होते. ऐश्वर्या जेव्हा जेव्हा सिनेमाच्या सेटवर असायची तेव्हा तिला पाहण्यासाठी गर्दी जमायची. ऐश्वर्या सिनेमात आहे म्हटल्यावर निर्माते सिनेमावर कितीही पैसे खर्च करायला तयार असायचे.
advertisement
2/8
मराठीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता तसंच दिग्दर्शकाने ऐश्वर्यासाठी चक्क सोन्याचा लेहेंगा तयार केला होता. ऐश्वर्यासाठी चाहते काहीही करायला तयार व्हायचे पण सोन्याचा लेहेंगा? मराठी अभिनेत्यानं असं का केलं होतं?
advertisement
3/8
ऐश्वर्या रायसाठी अभिनेत्याने सोन्याचा लेहंगा, तब्बल 3.5 किलो वजनाचा भव्य नेकलेस आणि एकूण 13 खास ज्वेलरी सेट तयार करून घेतले होते.
advertisement
4/8
इतकंच नाही तर ऐश्वर्याच्या भोवती सतत 40-50 सिक्युरिटी गार्डही ठेवले होते. आता तुम्ही म्हणाल हे एवढं कशासाठी.
advertisement
5/8
अभिनेत्याने हे सगळं ऐश्वर्याला वैयक्तिक नाही तर तिच्या सिनेमातील खास कॅरेक्टरसाठी केलं होतं. 2008 साली आलेल्या 'जोधा अकबर' या सिनेमाचा हा किस्सा आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक मराठमोळा आशुतोष गोवारिकर होता. कारण दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी मुघल काळातील भव्यता पडद्यावर आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.
advertisement
6/8
सिनेमाच्या शूटींगसाठी 80 हून अधिक हत्ती, 100 घोडे आणि 55 उंट वापरले गेले होते. हे सर्व युद्ध आणि शाही सीनसाठी आणले गेले होते. हृतिक आणि ऐश्वर्या यांना रिअलिस्टिक दाखवण्यासाठीही कोणतीही कसर सोडली नाही.
advertisement
7/8
'जोधा अकबर' सिनेमात एकूण 300 किलो दागिने वापरले गेले होते. सर्व दागिने तनिष्क ब्रँडकडून खरेदी केले गेले होते. ऐश्वर्याने जोधाबाईच्या लग्नाच्या सीनसाठी 3.5 किलो वजनाचा सेट परिधान केला होता. ऐश्वर्याने चित्रपटात फक्त एक किंवा दोन नाही तर 13 दागिन्यांचे सेट घातले होते. हृतिक रोशनने 8 दागिन्यांचे सेट घातले होते.
advertisement
8/8
आशुतोष गोवारीकर यांचा 'लगान' हा सिनेमा खूप लोकप्रिय झाला. 'जोधा अकबर', 'स्वदेश', 'मोहोंनजोदाडो' सारख्या उत्तमोत्तम सिनेमे तयार केलेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध मराठी अभिनेता, ज्याने ऐश्वर्या रायसाठी बनवला होता सोन्याचा लेहंगा, 3.5 किलोचा नेकलेस आणि 13 ज्वेलरी सेट