VOTE करायला गेलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं? कधी होती टॉपची एक्ट्रेस, हिरोच्या चक्करमध्ये बर्बाद झालं करिअर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
actress career flop due to love affair : विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सामान्य नागरिकांबरोबरच सेलिब्रेटींनी देखील मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे. अभिनेता अक्षय कुमारने सर्वात आधी मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर एका अभिनेत्रीला स्पॉट करण्यात आलं. ही अभिनेत्री बॉलिवूडची एकेकाळची टॉपची अभिनेत्री होती. आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे. करिअर पिकवर असताना अभिनेत्रीने एका हिरोच्या प्रेमात आपलं करिअर बर्बाद केलं. कोण आहे ही अभिनेत्री?
advertisement
1/8

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय त्या अभिनेत्रीने सलमान खानच्या 'कुर्बान' सिनेमातून डेब्यू केला. त्यानंतर ती 1992 साली आलेल्या 'खिलाडी' या सुपरहिट सिनेमात दिसली.
advertisement
2/8
'जो जीता वही सिकंदर' या सिनेमात आमिर खानबरोबर तिची जोडी हिट झाली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला तरी सिनेमातील 'पहला नशा' हे गाणं चांगलंच फेमस झालं.
advertisement
3/8
'मेहरबान', 'दलाल', 'संग्राम', 'वक्त हमारा' सारख्या अनेक सुपरहिट सिनेमात या अभिनेत्रीने काम केलं आहे.
advertisement
4/8
आपण ज्या अभिनेत्रीविषयी बोलतोय ती अभिनेत्री आयशा जुल्का. आयशा बॉलिवूडची सक्सेसफुल अभिनेत्री होती. पण 1997 नंतर आयशाचं करिअर फेल होऊ लागलं.
advertisement
5/8
या काळात आयेशाचं लक्ष करिअरवरून प्रेमाकडे शिफ्ट झालं होतं. अरमान कोहलीबरोबर तिचं अफेअर सुरू होतं. दोघांचं प्रेम प्रकरण खूप गाजलं. ती प्रेमात इतकी बुडाली की तिचा करिअरवरचा फोकस हलला.
advertisement
6/8
आयेशा आणि अरमान यांचा ब्रेकअप झाला तेव्हा आयेशाचं फिल्मी करिअर डबघाईला आलं होतं. दोघांनी 'खिलाडी', 'बारूद', 'वक्त हमारा' सारख्या सिनेमात एकत्र काम केलं होतं.
advertisement
7/8
आयेशा अनेक वर्षांनी मुंबईतील मतदान केंद्रावर दिसली. तिच्यात खूप बदल झाला आहे. तिच्या बदललेल्या लुकमुळे तिला ओळखणं शक्य झालं नाही.
advertisement
8/8
2003 साली आयेशाने कंस्ट्रक्शन कंपनीचा मालक समीर वाशीबरोबर लग्न केलं. आयशा आता नवऱ्याचा बिझनेस सांभाळते. 2018 साली 'जीनियस' हा तिचा एक सिनेमा रिलीज झाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
VOTE करायला गेलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं? कधी होती टॉपची एक्ट्रेस, हिरोच्या चक्करमध्ये बर्बाद झालं करिअर