TRENDING:

Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचं बॉलिवूड पदार्पण, वादग्रस्त डायरेक्टरसोबत करणार काम!

Last Updated:
Aaishvary Thackeray: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि जयदेव ठाकरे व स्मिता ठाकरे यांचे सुपुत्र बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झालाय.
advertisement
1/7
बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचं बॉलिवूड पदार्पण, वादग्रस्त डायरेक्टरसोबत करणार काम!
अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने आज जाहीर केले की त्यांचा बहुप्रतिक्षित थियेट्रिकल चित्रपट 'निशांची' यंदा 19 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
advertisement
2/7
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि जयदेव ठाकरे व स्मिता ठाकरे यांचे सुपुत्र ऐश्वर्य ठाकरे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ऐश्वर्यला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.
advertisement
3/7
सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि जार पिक्चर्सच्या बॅनरखाली, अजय राय आणि रंजन सिंग यांच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट, फ्लिप फिल्म्सच्या सहकार्याने साकारण्यात आला आहे.
advertisement
4/7
चित्रपटातून ऐश्वर्या ठाकरे दमदार पदार्पण करत असून, त्याच्या सोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद ज़ीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हे महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
advertisement
5/7
'निशांची' ही एक सशक्त आणि उत्कट क्राइम ड्रामा कथा असून, दोन भावांच्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांची, वेगवेगळ्या आयुष्याच्या वाटांवर चालत असताना त्यांच्या निर्णयांनी त्यांच्या आयुष्यावर कसे परिणाम होतात, याचे प्रभावी चित्रण करते.
advertisement
6/7
हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर प्रेक्षकांना एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देईल, अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. 'निशांची' हा चित्रपट रहस्य, प्रेम, संघर्ष आणि गुंतागुंतीच्या पात्रांनी भरलेला आहे.
advertisement
7/7
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले,“'निशांची' ची कथा आम्ही 2016 साली लिहिली होती आणि तेव्हापासून मी या चित्रपटाला त्याच्या मूळ रुपात साकारू इच्छित होतो. मला एक असा स्टुडिओ हवा होता ज्यांना माझ्यावर आणि माझ्या दृष्टीकोनावर पूर्ण विश्वास असेल. अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने ही संधी दिली आणि माझ्या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचं बॉलिवूड पदार्पण, वादग्रस्त डायरेक्टरसोबत करणार काम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल