TRENDING:

Bigg Boss 19 च्या ट्रॉफीची पहिली झलक समोर, विजेत्याला आणखी काय-काय मिळणार?

Last Updated:
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'च्या ग्रँड फिनानले अवघे दोन दिवस बाकी आहेत. अशातच आता या सीझनच्या चमकत्या ट्रॉफीची पहिली झलक समोर आली आहे.
advertisement
1/7
Bigg Boss 19 च्या ट्रॉफीची पहिली झलक समोर PHOTOS
'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या दोन दिवसांत 'बिग बॉस 19'चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे TOP 5 फायनलिस्टसाठी पुढचे काही तास खूपच महत्त्वाचे आहेत. 'टॉप 5'मध्ये फरहाना भट्ट, गौरव खन्ना, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि प्रणित मोरे या स्पर्धकांचा समावेश आहे.
advertisement
2/7
'बिग बॉस 19'च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात फिनालेआधी मालती चाहर बाहेर पडली आहे. मालतीचा या खेळातील प्रवास संपल्याने प्रणित मोरेला खूप वाईट वाटलं होतं.
advertisement
3/7
'बिग बॉस 19'चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. 'बिग बॉस 19'च्या या भागात अवेज दरबार, गौरव खन्ना, अशनूर कौर, शहबाज बदेशा, नगमा मिराजकर, बसीर अली, तान्या मित्तल, अभिषेक बजाज, नेहल चुडासमा, जीशान कादरी, नीलम गिरी, मृदुल तिवारी, कुणिका सदानंद, प्रणित मोरे, नतालिया जानोसजेक, अमाल मलिक, फरहाना भट्ट, शहबाज बादेशा आणि मालती चाहर हे स्पर्धक सहभागी झाले होते.
advertisement
4/7
'बिग बॉस 19'च्या चमकत्या ट्रॉफीची पहिली झलक आता समोर आली आहे. या ही ट्रॉफी यंदाच्या सीझनची थीम 'घरवालों की सरकार'ला मॅच करणारी आहे.
advertisement
5/7
'बिग बॉस 19'च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात बिग बॉसने सर्वप्रथम या पर्वाच्या टॉप 5 फायनलिस्टला या ट्रॉफीची पहिली झलक दाखवली. ट्रॉफी फक्त पाहूनच अमाल मलिक, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि गौरव खन्ना यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
advertisement
6/7
'बिग बॉस 19'च्या यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीची डिझाइन नेहमीपेक्षा वेगळी आहे. नव्या रुपात ही ट्रॉफी बनवण्यात आली आहे. हिऱ्यांनी सजलेल्या या ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलं जाणार हे दोन दिवसांतच स्पष्ट होईल.
advertisement
7/7
'बिग बॉस 19'च्या विजेत्याला चमकत्या ट्रॉफीसह 50 लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे. त्यामुळे आता 'बिग बॉस'प्रेमींच्या नजरा ग्रँड फिनालेकडे लागल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19 च्या ट्रॉफीची पहिली झलक समोर, विजेत्याला आणखी काय-काय मिळणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल