Bigg Boss 19 जिंकून गौरव खन्ना मालामाल! जिंकल्यावरही मिळाले नाहीत तेवढे एका महिन्यात कमावले
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Gaurav More Fees for Bigg Boss 19 : बिग बॉस 19 चा विजेता गौरव खन्नाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा पाहायला मिळतेय. टेलिव्हिजनचा आघाडीच्या नायकानं रिअलिटी शो देखील गाजवला. तुम्हाला माहिती आहे का गौरव खन्नाची आठवड्याची फी ही त्याच्या प्राइज मनी पेक्षा अधिक होती.
advertisement
1/8

सलमान खानच्या रिअॅलिटी शो, बिग बॉस 19 चा शेवटचा भाग ब्लॉकबस्टर होता. गौरव खन्नाने फरहाना भट्टला मागे टाकून विजेतेपद पटकावलं. गौरव खन्नाला बिग बॉस 19 च्या विजेत्याची ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांची बक्षिसे मिळाली. पण तुम्हाला माहिती आहे का बक्षिसाच्या रकमेपेक्षा गौरव खन्नाची बिग बॉसची फी जास्त आहे.
advertisement
2/8
गौरव खन्नाची टेलिव्हिजन जगतात एक उल्लेखनीय कारकीर्द आहे. त्याने अनुपमा मालिकेत तिचा नवरा अनुज कपाडियाची भूमिका साकारली. त्याची फिमेल फॅन फॉलोविंग खूप आहे. गौरव खन्नाने सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये भाग घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. तो त्या सीझनचा विजेता ठरला होता. एकाच वर्षात गौरव खन्नाने दोन मोठ्या रिअलिटी शोच्या ट्रॉफी आपल्या नावे केल्या.
advertisement
3/8
गौरव खन्नाने पहिल्याच दिवशी बिग बॉस 15 मध्ये प्रवेश केला आणि 15 आठवड्यांचा प्रवास पूर्ण केला. त्याची आठवड्याची फी 17.5 लाख रुपये होते. तो शोमधील सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक होता. दर आठवड्याचे मिळून ग्रँड फिनालेच्या दिवसापर्यंत त्याने एकूण 2.62 कोटी रुपये कमावले आहेत.
advertisement
4/8
बिग बॉस 19 च्या ट्रॉफीसह गौरव खन्नाला 50 लाख रुपयांची रक्कम मिळाली. म्हणजेच गौरव खन्ना एकूण 3 कोटी 12 लाख रुपयांची कमाई केली आहे. गौरव खन्नाची दररोजची फी आणि ग्रँड फिनाले त्याला मिळालेली बक्षिसाची रक्कम ही अंदाजे 6.25 पट आहे.
advertisement
5/8
अनुपमा मालिकेसाठी सुरुवातीला गौरव खन्नाला 35 हजार दरदिवशी मिळत होते. या शोमुळे गौरव खन्नाला या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.
advertisement
6/8
मार्केटिंग मॅनेजर म्हणून गौरव खन्नाने त्याच्या करिअरची सुरूवात केली होती. गौरव खन्ना हा कानपूरमधील सिव्हिल लाइन्सचा रहिवासी आहे. शालेय शिक्षणानंतर मुंबईत आला. त्याने मुंबईत MBA पूर्ण केलं.
advertisement
7/8
गौरवने एका आयटी फर्ममध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं. परंतु त्यांना नेहमीच अभिनयाची आवड होती. त्याने अनेक मालिकांमध्ये काम करत आपली एक नवी ओळख निर्माण केली.
advertisement
8/8
'भाभी', 'कुमकुम: एक प्यारा सा बंधन', 'मेरी डोली तेरे अंगना', 'जीवनसाथी: हमसफर जिंदगी के', 'सीआयडी', 'प्रेम या पहेली: चंद्रकांता', 'अनुपमा' सारख्या हिट मालिका अभिनेता गौरव खन्नाच्या नावे आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19 जिंकून गौरव खन्ना मालामाल! जिंकल्यावरही मिळाले नाहीत तेवढे एका महिन्यात कमावले