4 गाड्यांची लावली वाट, अभिनेत्याविरोधात ड्रंक अँड ड्राइव्हची केस; फिल्म नाही Bigg Boss मुळे मिळालेली प्रसिद्धी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Actor Drunk And Drive Case : बिग बॉसमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आता ड्रंक अँड ड्राइव्ह केसमुळे चर्चेत आला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
1/5

सध्या बिग बॉस मराठी 6 चांगलंच गाजतं आहे. याचदरम्यान बिग बॉसमुळेच फेमस झालेला एक अभिनेता ज्याच्याविरोधात ड्रंक अँड ड्रायइव्हची केस झाली आहे. त्याच्यावर दारू पिऊन चार गाड्यांना ठोकल्याचा आरोप आहे.
advertisement
2/5
कर्नाटकच्या बंगळुरूमधील ही घटना आहे. 28 जानेवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जुना विमानतळ रोडवरील कमांडो हॉस्पिटल सिग्नलजवळ ही घटना घडली. इतर गाड्या सिग्नलवर थांबलेल्या असताना अभिनेत्याच्या गाडीने मागून येत धडक दिली. या घटनेत एकूण चार गाड्यांचं नुकसान झालं आहे. या घटनेत दोन स्विफ्ट डिझायर आणि आणखी एका सरकारी कारचा समावेश आहे.
advertisement
3/5
हालसुरू वाहतूक पोलिसांनी अभिनेत्याची ब्रेथअलायझर चाचणी केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. अपघातात जखमी झालेल्या कार चालकाच्या तक्रारीवरून वाहतूक पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
4/5
घटनेनंतर पोलिसांनी अभिनेत्याची फॉर्च्युनर जप्त करण्यात केली. अभिनेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मोटार वाहन कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
advertisement
5/5
मयुर पटेल असं या अभिनेत्याचं नाव आहे. तो साऊथ अभिनेता आहे आणि बिग बॉस कन्नडचा स्पर्धकही राहिला आहे. दुसऱ्या सीझनमध्ये तो दिसला. त्याने काही फिल्म्स केल्यात. पण फिल्मपेक्षा तो बिग बॉसमुळे अधिक प्रसिद्ध झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
4 गाड्यांची लावली वाट, अभिनेत्याविरोधात ड्रंक अँड ड्राइव्हची केस; फिल्म नाही Bigg Boss मुळे मिळालेली प्रसिद्धी