स्पर्धक शॉक, गुलीगत रॉक! TikTok करून सूरज दिवसाला कमवायचा इतके हजार, BBMमध्ये केला खुलासा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण अर्थात गुलीगत बिग बॉस मराठी पाचच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. सूरजला बिग बॉसच्या घरात पाहून सगळ्यांचा भुवया उंचावल्या आहेत. घरात सूरजनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
advertisement
1/5

टिक टॉकच्या काळात गुलीगत नावानं सूरज चव्हाण सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाला.
advertisement
2/5
टिक टॉकवर त्याचे 2-3 लाख फॉलोअर्स होते. बारामतीच्या एका खेडेगावात राहत असलेल्या सूरजचं नशीबच बदललं.
advertisement
3/5
एकेकाळी आर्थिक परिस्थितीमुळे मजुरीची काम करून पोट भरणाऱ्या सूरजच्या आयुष्यात पैशांचा पाऊसच पडला असं म्हणायला हरकत नाही.
advertisement
4/5
बिग बॉस मराठी 5च्या घरात सूरजनं त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. घरातील पहिल्याच दिवशी काही स्पर्धकांशी बोलताना सूरजनं त्याला मिळणाऱ्या मानधनाविषयी सांगितलं.
advertisement
5/5
सूरज म्हणाला, "मला दिवसाला 80 हजार रुपये मिळायचे. एक रिबीन कापण्यासाठी 80 हजार रुपये द्यायचे लोक. आता थोडे कमी झाले आहेत. आता 40-50 हजार रुपये देतात. पण तेव्हा खूप मिळायचे. मला पैसे मिळायला लागले आणि लोकांनी मला फसवलं. माझ्या बहिणी आणि आत्या मला हेच सांगतात की लोकांकडून फसवला जाऊ नकोस".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
स्पर्धक शॉक, गुलीगत रॉक! TikTok करून सूरज दिवसाला कमवायचा इतके हजार, BBMमध्ये केला खुलासा