सुपरस्टारच्या Ex गर्लफ्रेंडच्या प्रेमात पडला अभिनेता, उद्ध्वस्त झालं करिअर, एका चुकीमुळे सगळंच संपलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Controversy : एक काळ असा होता जेव्हा या अभिनेत्रीच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली होती. तिच्या अफेअर्सच्या बातम्यांनीही त्यावेळी लाईमलाइट चोरली होती.
advertisement
1/8

१९९४ साली मिस वर्ल्ड जिंकलेली ऐश्वर्या राय आजही तिच्या सौंदर्यामुळे भारतातील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. आज ऐश्वर्या तिच्या संसारात रमली असली, तरीही एक काळ असा होता जेव्हा तिच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली होती. तिच्या अफेअर्सच्या बातम्यांनीही त्यावेळी लाईमलाइट चोरली होती.
advertisement
2/8
प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि बॉलिवूडच्या एका हँडसम हंकची प्रेमकथा एकेकाळी खूप गाजली होती. ऐश्वर्यासोबत सलमान खानचे नाव जोडले गेले, पण त्यांच्या नात्याचा शेवट खूप वाईट झाला.
advertisement
3/8
त्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात एक असा अभिनेता आला, ज्यामुळे तिच्या आणि सलमानच्या नात्यामध्ये एक मोठा वाद निर्माण झाला. ऐश्वर्या राय आज सुखी संसारात रमली आहे, पण तिच्या आयुष्यातल्या त्या दोन नावांची आजही खूप चर्चा होते.
advertisement
4/8
तो अभिनेता दुसरा कोणी नसून विवेक ओबेरॉय आहे. एकेकाळी विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. 'क्यों हो गया ना' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची ओळख झाली आणि काही महिन्यांतच त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पण याच नात्यामुळे विवेकचा सलमान खानसोबत मोठा वाद झाला.
advertisement
5/8
सलमान खानला हे नातं आवडलं नव्हतं आणि त्याने विवेक ओबेरॉयला धमक्या द्यायला सुरुवात केली. विवेकने स्वतः एका पत्रकार परिषदेत याचा खुलासा केला होता. त्याने सांगितले की, 'सलमानने त्याला रात्री १२.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत जवळपास ४० फोन केले होते. त्यात शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.'
advertisement
6/8
विवेक ओबेरॉयने सलमान खानविरोधात घेतलेली ही भूमिका ऐश्वर्या रायला आवडली नाही. तिने विवेकपासूनही स्वतःला दूर केले. त्यानंतर तिची ओळख अभिनेता अभिषेक बच्चनशी झाली आणि २००७ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यानंतर, विवेकच्या आयुष्यातही एका नव्या नात्याची सुरुवात झाली.
advertisement
7/8
२००९ मध्ये विवेकची ओळख प्रियांका अल्वाशी झाली. रिपोर्टनुसार, प्रियांकाला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला आणि त्याने लग्नासाठी प्रपोज केले. २९ ऑक्टोबर २०१० रोजी दोघांनी लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. प्रियांका अल्वा कर्नाटकचे माजी विधानसभा सदस्य जीवराज अल्वा यांची मुलगी आहे.
advertisement
8/8
विवेक ओबेरॉयने २००२ मध्ये 'कंपनी' या चित्रपटातून त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘साथिया’, ‘मस्ती’, ‘शूटआउट एट लोखंडवाला’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले. अभिनयासोबतच विवेक आता एक यशस्वी उद्योजक म्हणूनही ओळखला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुपरस्टारच्या Ex गर्लफ्रेंडच्या प्रेमात पडला अभिनेता, उद्ध्वस्त झालं करिअर, एका चुकीमुळे सगळंच संपलं