Bigg Boss Marathi 6 च्या पहिल्या आठवड्यात कोण HIT कोण FLOP? भाऊच्या धक्क्यावर मिळाला रिअॅलिटी चेक
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी 6'चा नुकताच पहिला आठवडा पार पडला. नुकत्याच पार पडलेल्या 'भाऊच्या धक्क्यावर' रितेश देशमुखने कोण हिट कोण फ्लॉप हे सांगत स्पर्धकांना रिअॅलिटी चेक दिला.
advertisement
1/7

'बिग बॉस मराठी 6'ची सुरुवात दणक्यात झाली असल्याचं समोर आलं आहे. या कार्यक्रमातील अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'बिग बॉस मराठी 6'मध्ये एकूण 17 स्पर्धकांची एन्ट्री झाली. काहींनी शॉर्ट कटच्या दाराची निवड केली. तर काहींनी मेहनतीच्या दाराने प्रवेश केला.
advertisement
2/7
'बिग बॉस मराठी 6'च्या नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या वहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. ज्या स्पर्धकांचा खेळ उत्तम सुरू आहे त्यांचं कौतुक केलं. तर जे स्पर्धक खेळत नाही आहेत त्यांना खेळण्याचा सल्ला दिला.
advertisement
3/7
'बिग बॉस मराठी 6'च्या पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या नऊ स्पर्धकांपैकी कोणालाही नारळ देण्यात आलेला नाही. तर पुढच्या आठवड्यात आणखी चांगलं खेळण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आली आहे.
advertisement
4/7
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या आठवड्यात सागर कारंडे, सोनाली राऊत, करण सोनावणे आणि प्रभु शेळके हे स्पर्धक हिट ठरले आहेत. आपल्या खेळाने या स्पर्धकांनी पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
advertisement
5/7
दिपाली सय्यद आणि दिव्या शिंदे हे दोन स्पर्धक उत्तम खेळत असून त्यांना आणखी चांगलं खेळण्याचा सल्ला रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर दिला आहे.
advertisement
6/7
तन्वी कोलते आणि रुचिता जामदार या दोन स्पर्धकांची रितेश देशमुखने चांगलीच कानउघडणी केली. नेटकऱ्यांकडूनही तन्वी आणि रुचिता यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.
advertisement
7/7
'बिग बॉस मराठी 6'च्या पहिल्या आठवड्यात आयुष संजीव, अनुश्री माने, राकेश बापट, रोशन भजनकर, राधा पाटील, ओमकार राऊत हे स्पर्धक कमी दिसले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या पहिल्या आठवड्यात कोण HIT कोण FLOP? भाऊच्या धक्क्यावर मिळाला रिअॅलिटी चेक