TRENDING:

पहाटे ३ वाजता काळ आला! मालेगावजवळ ट्रॅव्हल्स अन् पिकअपची भीषण धडक, चौघांचा मृत्यू

Last Updated:
Malegaon Manmad Highway accident: पुण्याहून मालेगावला निघाले पण पोहोचण्याआधीच काळाचा घाला! पहाटे 3 वाजता भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, कुठे आणि कसा घडला अपघात वाचा सविस्तर.
advertisement
1/6
पहाटे ३ वाजता काळ आला! मालेगावजवळ ट्रॅव्हल्स अन् पिकअपची भीषण धडक,चौघांचा मृत्यू
बब्बू शेख, प्रतिनिधी मालेगाव: मालेगाव-मनमाड महामार्गावर आज पहाटे मृत्यूने भीषण घाला घातला. वऱ्हाणे गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, २ जण गंभीर जखमी आहेत.
advertisement
2/6
धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहन थेट बसच्या पुढच्या भागात घुसले, ज्यामुळे वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही खासगी ट्रॅव्हल्स पुण्याकडून मालेगावच्या दिशेने येत होती.
advertisement
3/6
पहाटे तीनच्या सुमारास सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना वऱ्हाणे गावाजवळ समोरून येणाऱ्या पिकअपची आणि बसची जोरदार टक्कर झाली. शांतता असलेल्या महामार्गावर अचानक मोठा आवाज झाला आणि प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला. अपघातानंतर बसमधील २० हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
advertisement
4/6
अपघाताचा आवाज ऐकताच वऱ्हाणे गावातील ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. जखमींना तातडीने मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमी असलेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
advertisement
5/6
या भीषण अपघातामुळे मालेगाव-मनमाड मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, हा अपघात ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे झाला की अन्य काही तांत्रिक कारणामुळे, याचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत
advertisement
6/6
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे मालेगाव–मनमाड मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मृतांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
पहाटे ३ वाजता काळ आला! मालेगावजवळ ट्रॅव्हल्स अन् पिकअपची भीषण धडक, चौघांचा मृत्यू
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल