ना रुचिता ना तन्वी, फेमस सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर BBM 6 च्या घरातला चोर, अखेर नाव आलं समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठी 6च्या घरात सोनाली राऊतची चावी चोरणारा चोर सापडला. रितेशनं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 सुरू झालं आणि पहिल्याच आठवड्यात घरात फुल ऑन राडा पाहायला मिळाला. घरात चोरी झाल्याचं उघड झालं. जी पावर की घेऊन सोनाली राऊत शॉर्टकटच्या मार्गाने घरात आली होती तिची ती चावीच चोरीला गेली. चावी चोरली कोणी असा प्रश्न घरातील सगळ्यांना पडला. पण चावी नेमकी कोणी चोरी हे कोणीही सांगितलं नाही.
advertisement
2/7
सुरुवातीला रुचिताने बेट लावून करणला स्विमिंग पूलचं पाणी प्यायला सांगितलं. त्याबदल्यात तिने तिची चावी करणला दिली. त्यानंतर टास्क दरम्यान चावी लागणार होती मात्र करणने तन्वीला चावी दिली नाही. त्यानंतर घरात खूप इमोशनल राडा झाला.
advertisement
3/7
रुचिताची चावी करणकडे आहे. करणने त्याच्या चावीचा वापर केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणीतरी सोनालीची चावी चोरली. काही वेळाने ती चावी बाथरूममध्ये पडलेली सापडली.
advertisement
4/7
पहिल्यांदा ती चावी सचिन कुमावत यांनी पाहिली. त्यानंतर सागर आणि इतर सगळे तिथे आले. चावी कोणी चोरली असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. चोरीचा आळ सागर, सचिन आणि आयुषवर घेण्यात आला.
advertisement
5/7
सागर, सचिन आणि आयुष यांनी जेवण सोडलं. त्यानंतर ते सगळ्यांशी बोलले आणि चावी कोणी चोरली याचा अंदाजा घेतला. त्यांना तन्वी आणि रुचिता यांच्यावर संशय होता. पण भाऊच्या धक्क्यावर मात्र वेगळाच चोर समोर आला.
advertisement
6/7
रितेशने भाऊच्या धक्क्यावर एक क्लिप दाखवली ती चावी चोराची होती. चावी चोर हा अनुश्री माने होती. अनुश्रीने चावी चोरली. हा तिचा गेम असल्याचं सांगत तिने चावी चोरल्याचं कबूल केलं. पण मी हे शेवटपर्यंत कोणाला सांगणार नाही. बाहेर आल्यानंतर सगळ्यांना कळेलच. मला सुद्धा सगळ्यांची काळजी आहे. त्यांच्याबरोबर मी देखील जेवले नाही, असं तिने सांगितलं.
advertisement
7/7
अनुश्री माने हिनं चावी चोरल्याचं समोर येताच सगळेच शॉक झाले. घरातील सदस्यांनी चावी चोराचं नाव सांगण्यात आलेलं नाही. आता घरात पुढे काय घडणार हे पाहणं इंटेस्ट्रिंग ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना रुचिता ना तन्वी, फेमस सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर BBM 6 च्या घरातला चोर, अखेर नाव आलं समोर