TRENDING:

भाऊ नाही रितेश म्हणायचं! रितेश देशमुखनं दिपालीला ठणकावून सांगितलं, भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडलं?

Last Updated:
Riteish Deshmukj - Deepali Sayyad : Bigg Boss Marathi 6 च्या भाऊच्या धक्क्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये रितेश देशमुखनं दिपाली सय्यदला मला भाऊ म्हणायचं नाही असं ठणकावून सांगितलं. भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडलं?
advertisement
1/8
भाऊ नाही रितेश म्हणायचं! रितेश देशमुखनं दिपालीला ठणकावून सांगितलं, पण का?
बिग बॉस मराठी 6 चा पहिला भाऊचा धक्का सुरू आहे. ज्यात रितेशनं पहिल्या आठवड्याचा रिकॅप देत सगळ्यांची शाळा घेतली. रुचिता जामदार, तन्वी कोलते तसंच ओमकार राऊत आणि विशाल कोट्टीयन यांची चांगलीच शाळा घेतली. 
advertisement
2/8
दरम्यान रितेशनं अभिनेत्री दिपाली सय्यदला देखील इशारा देत झापलं. मला भाऊ नाही फक्त रितेश म्हणा, असं म्हणत रितेश दिपालीवर चिडला. दिपाली रितेशला असं बोलली तरी काय? 
advertisement
3/8
रितेशनं तन्वी कोलते हिला तिच्या वागण्यावरून खूप झापलं. त्याचबरोबर तिचं कौतुक केलं. तन्वी मकर संक्रांतीच्या दिवसी दिपालीची मदत करायला गेली तेव्ही दिपालीने मदत नाकारली. दोघींची सणाच्या दिवशी खूप भांडण झालं. यावर रितेशने दिपालीची बाजू ऐकून घेतली. 
advertisement
4/8
दिपाली म्हणाली, "मला नकोय तिची मदत. प्रत्येकाच्या विषयात तिला जायचं असतं. तिला वाटतं ती खूप चांगली आहे. तिला सगळं करायचं आहे. हेल्पिंग नेचर आहे.मला ते आवडंत, मला ते करायचं आहे. आणि त्याआधीच माझं आणि तिचं झालं होतं."
advertisement
5/8
"तिला मी बोलताना ऐकलं होतं मी बरोबर आहे, मी चेंज होणार नाही. हे ऐकल्यानंतर मला असं वाटलं की मला तिच्याशी बोलायचं नाही. मी ओमला सांगत होते की गॅस ऑन कर. पण ती मुद्दाम तिथे आली. मी तिला सांगितलंच नव्हतं."
advertisement
6/8
रितेशनं विचारलं, "तुम्ही म्हणताय, ती मुद्दाम आली होती, मुद्दाम म्हणजे का?" दिलापी म्हणाली, "तिला माझ्याशी बोलायचं होतं." रितेश म्हणाला, "मग चांगली गोष्ट आहे ना, त्यात वाईट काय आहे."
advertisement
7/8
दिपाली म्हणाली, "चांगली गोष्ट आहे, पण माझी इच्छा नाहीये, माझं मन करत नाहीये."  रितेश म्हणाला, "आपण एकच घरात राहतो, तीन दिवसच झालेत." त्यावर दिपाली म्हणाली, "हो करणार, नक्कीच नक्कीच RD मी करणार." 
advertisement
8/8
दिपालीने रितेशला RD म्हणताच रितेशनं दिपालीकडे बोट करत म्हटलं, "मी बोलतोय, मी रितेश आहे RD नाहीये." दिपाली म्हणाली, "हो, जी रितेश भाऊ." रितेश म्हणाला, "भाऊपण नको, रितेश म्हणा, नो प्रॉब्लेम. "
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भाऊ नाही रितेश म्हणायचं! रितेश देशमुखनं दिपालीला ठणकावून सांगितलं, भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडलं?
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल