गौतमी पाटील खरं बोलली, पण ही लावणी डान्सर निघाली खोटारडी? 'Bigg Boss Marathi'च्या घरातनं मोठी बातमी
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi Season 6 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातनं एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीचे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
1/8

'बिग बॉस मराठी सीझन 6' हा छोट्या पडद्यावरील बहुप्रतीक्षित वादग्रस्त कार्यक्रम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या कार्यक्रमाची 'बिग बॉस'चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 11 जानेवारीपासून या नव्या सीझनची सुरुवात होत आहे. दरम्यान या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
advertisement
2/8
'बिग बॉस मराठी सीझन 6'च्या संभाव्य स्पर्धकांमध्ये गौतमी पाटीलचं नाव अग्रस्थानी होतं. गौतमी यंदाचा सीझन गाजवणार असल्याची चर्चा होती. पण गौतमीने काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस'च्या चर्चांवर मौन सोडलं.
advertisement
3/8
एबीपीला दिलेल्या मुलाखतीत 'बिग बॉस मराठी'एन्ट्रीबाबत होत असलेल्या चर्चांबाबत गौतमी पाटील म्हणालेली,"बिग बॉस मराठी'साठी मला विचारणा झाली होती. मागच्या सीझनसाठीदेखील मला विचारलं होतं. 'बिग बॉस'चा खेळ खूप छान आहे. 'बिग बॉस'मध्ये गेल्यावर लोकांचं करिअर होतंच असं नाही. पण माझं न जाण्याचं कारण वेगळं होतं".
advertisement
4/8
गौतमी पुढे म्हणालेली,"मी आईला सोडून जास्त दिवस राहू शकत नाही. तीन-चार दिवसांपेक्षा जास्त दिवस मी आईला सोडून राहू शकत नाही. पण 'बिग बॉस'खरंच बेस्ट आहे".
advertisement
5/8
गौतमी पाटीलने 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाण्याबाबत स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे चाहते नाराज झाले. अशातच सुप्रसिद्ध नृत्यांगना लावणी डान्सर सायली पाटीलने 'बिग बॉस मराठी' बाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
advertisement
6/8
सायली पाटीलचा 'बिग बॉस मराठी'बाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सायली पाटील म्हणतेय,"मला दोन दिवसांपूर्वी मेल आला आलाय. मी काय करू तुम्ही सांगा. इंटरेस्टेड आहात का? असा मला मेल आलाय. मी 'बिग बॉस मराठी'त जायला हवं की नको? तुमचं काय मत आहे यावर ते मला कमेंट करुन नक्की सांगा. मला माहिती नाही मी कशी दिसते?
advertisement
7/8
सायलीच्या व्हायरल व्हिडीओवर न्यूज 18 मराठीला 'कलर्स'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस'च्या टीमकडून कोणालाही मेल करण्यात आलेला नाही".
advertisement
8/8
एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामुळे गौतमी पाटीलचा खरेपणा चाहत्यांना भावलाय. तर सायली पाटील खोटारडी आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गौतमी पाटील खरं बोलली, पण ही लावणी डान्सर निघाली खोटारडी? 'Bigg Boss Marathi'च्या घरातनं मोठी बातमी