TRENDING:

2 लग्नानंतरही 13 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता सुपरस्टार, 10 वर्ष चाललं अफेअर, आजही हिरोईन सिंगल

Last Updated:
Bollywood Celebrity Birthday : दोन लग्नांनंतरही, सुपरस्टार १३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांचं अफेअर १० वर्षे चाललं. मात्र आजही ही अभिनेत्री अविवाहित आहे.
advertisement
1/9
2 लग्नानंतरही 13 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता सुपरस्टार
मुंबई: दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावणारे सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी २९ ऑगस्ट रोजी ६६ वर्षांचे होत आहेत.
advertisement
2/9
त्यांच्या कारकिर्दीइतकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिलं आहे. त्यांनी दोन लग्नं केली, पण त्यानंतरही त्यांचं मन एका बॉलिवूड अभिनेत्रीवर जडलं होतं.
advertisement
3/9
नागार्जुन यांनी पहिलं लग्न १९८४ मध्ये लक्ष्मी दग्गुबातीसोबत केलं होतं. हे अरेंज मॅरेज होतं, पण सहा वर्षांनंतर ते दोघे वेगळे झाले.
advertisement
4/9
त्यानंतर १९९२ मध्ये त्यांनी अभिनेत्री अमला अक्किनेनीसोबत दुसरं लग्न केलं. या दोघांना नागा चैतन्य आणि अखिल अक्किनेनी अशी दोन मुलंही आहेत.
advertisement
5/9
पण लग्नानंतरही नागार्जुन यांच्या आयुष्यात एका मोठ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली, जी तब्बल १० वर्षं त्यांच्यासोबत होती. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून, तबू आहे.
advertisement
6/9
तबू आणि नागार्जुन यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि याच काळात त्यांच्यात जवळीक वाढली. त्यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांनी तब्बल १० वर्षं एकमेकांना डेट केलं होतं.
advertisement
7/9
पण, या प्रेमकहाणीचा शेवट दुर्दैवी झाला. नागार्जुन त्यांच्या पत्नी अमलाला सोडून जायला तयार नव्हते. त्यांच्यासाठी त्यांचं कुटुंब खूप महत्त्वाचं होतं. यामुळे तब्बूने त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
8/9
या दोघांनीही कधीच आपल्या नात्याबद्दल जाहीरपणे काहीही सांगितलं नाही. पण त्यांच्या नात्याची चर्चा आजही होते. विशेष म्हणजे, ५२ वर्षांची झालेली अभिनेत्री तब्बू आजही अविवाहित आहे.
advertisement
9/9
नागार्जुन यांच्यासोबतच्या नात्यामुळेच तिने लग्न केलं नाही, असं अनेकजण मानतात. तब्बू आणि नागार्जुन यांच्यात एक मोठं प्रेम होतं, पण त्या प्रेमाला लग्नापर्यंत पोहोचता आलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 लग्नानंतरही 13 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता सुपरस्टार, 10 वर्ष चाललं अफेअर, आजही हिरोईन सिंगल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल