‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ मधील तो KISSING SEEN, लक्ष्यच्या मॅनेजरशी लिपलॉक करणारी 'ती' अभिनेत्री आहे तरी कोण?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
The Bads of Bollywood : आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजमध्ये बॉबी देओल आणि लक्ष्य यांसारखे मोठे कलाकार असले तरी, एका छोट्या भूमिकेतील अभिनेत्रीने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement
1/8

मुंबई: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली आणि नेटफ्लिक्सवर १८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेली 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही वेबसीरिज सध्या खूप फेमस आहे.
advertisement
2/8
बॉबी देओल आणि लक्ष्य यांसारखे मोठे कलाकार या मालिकेत असले तरी, एका छोट्या भूमिकेतील अभिनेत्रीने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement
3/8
या सीरिजमधील अनेक कलाकार त्यांच्या लहान पण दमदार भूमिकेमुळे चर्चेत आहेत. अशीच चर्चा आहे एका अभिनेत्रीची, जिने एका महत्त्वाच्या सीनमध्ये लक्ष वेधले आहे.
advertisement
4/8
लक्ष्यच्या मॅनेजरची भूमिका साकारणाऱ्या आन्या सिंगसोबत या अभिनेत्रीचा पडद्यावरचा लिप लॉक सीन चांगलाच गाजला. हा सीन पाहून लोकांना तिची ओळख जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. पण ही अभिनेत्री आहे तरी कोण?
advertisement
5/8
लक्ष्यच्या मॅनेजरशी पडद्यावर किसिंग सीन देणाऱ्या अभिनेत्रीचे नाव सुमैया शेख आहे. विशेष म्हणजे, ती ऑनलाइन जगात 'एलिसिया' या नावाने ओळखली जाते. सोशल मीडियावर सुमैया खूप सक्रिय असते आणि तिचे ६३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
advertisement
6/8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये सुमैयाची भूमिका खूप छोटी आहे, पण हा सीन खूप वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल सीननंतरच अनेक लोक या अभिनेत्रीचा शोध घेत आहेत. सुमैयाचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले, तर तिच्या अनेक पोस्ट्समध्ये फॅशन आणि प्रवासाचे अपडेट्स दिसतात.
advertisement
7/8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिविक शर्मा हा कलाकारही आहे. त्याच्यासोबत सुमैयाचे काही फोटो सोशल मीडियावर दिसतात. या दोन्ही कलाकारांनी ब्रँड्सच्या प्रमोशनल ॲडसाठी एकत्र काम केले आहे.
advertisement
8/8
विशेष म्हणजे, सुमैयाने तिच्या सोशल मीडियावर 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'शी संबंधित कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. तरीही, चाहत्यांनी सीरिजच्या कास्ट लिस्टमधून तिचे नाव शोधून काढले आहे आणि आता ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ मधील तो KISSING SEEN, लक्ष्यच्या मॅनेजरशी लिपलॉक करणारी 'ती' अभिनेत्री आहे तरी कोण?