TRENDING:

Dashavatar OTT Release : हा विकेंड रिकामी ठेवा, बजेटच्या पाचपट कमाई करणारा 'दशावतार' ओटीटीवर येतोय, तारीख आली समोर

Last Updated:
Dashavatar OTT Release : हा विकेंड राखून ठेवा. बजेटच्या पाचपट कमाई करणारा दशावतार हा सिनेमा लवकरच ओटीटीवर रिलीज होतोय. पण तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म?
advertisement
1/8
हा विकेंड रिकामी ठेवा, बजेटच्या पाचपट कमाई करणारा 'दशावतार' ओटीटीवर येतोय
सुबोध खानोलकर दिग्दर्शित आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर अभिनीत दशावतार या सिनेमानं 2025 हे वर्ष गाजवलं. दशावतार हा 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक सिनेमा बनला आहे. कांतारा सारखा सिनेमा समोर असतानाही दशावतारने आपले पाय घट्ट रोवले होते. सिनेमा रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचे शो वाढवण्यात आले.
advertisement
2/8
कोकणातील अनेक बंद चित्रपट गृहांची दारे 'दशावतार' ने पुन्हा उघडली. अमेरिकेत शंभरहून जास्त शो दाखवण्यात आल. ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देशही येथे 'दशावतार'ने आपला झेंडा फडकवला आहे.
advertisement
3/8
दशावतार या सिनेमाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपट, नाटक आणि सामाजिक वर्तुळातही सिनेमाची खूप प्रशंसा झाली.
advertisement
4/8
मराठी चित्रपट उद्योगाला आलेली मरगळ झटकून मराठी चित्रपटाला नवचैतन्य देण्याचे काम दशावतार सिनेमानं केलं आहे . इतकंच नाही तरदशावतारी कलाप्रकाराचा आधार या सिनेमात घेतल्याने ती लोककला आणि दशावतारी कलाकारांना पुन्हा एक तेजी मिळवून देण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला.
advertisement
5/8
'दशावतार' या सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही तर कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी जनमानसात एक चळवळ उभी करण्याचं कामही केलं आहे.
advertisement
6/8
सिनेमात अभिनेते दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
advertisement
7/8
दशावतार हा सिनेमा आता या आठवड्यात म्हणजेच 14 नोव्हेंबरला Z5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. त्यामुळे आपल्या कोकणातलो दशावतार बघूक विसरू नका.
advertisement
8/8
दशावतार सिनेमाचं बजेट 4 कोटी इतकं होतं. सिनेमानं पहिल्या दिवशीच बजेट वसूल केलं होतं. सिनेमानं भारतात 23 कोटींहून अधिक कमाई केली तर सिनेमाचं वर्ल्ड वाईल्ड कलेक्शन हे 28 कोटींहून अधिक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dashavatar OTT Release : हा विकेंड रिकामी ठेवा, बजेटच्या पाचपट कमाई करणारा 'दशावतार' ओटीटीवर येतोय, तारीख आली समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल