बरेच तास देवानंदच्या मांडीवर बसून होती अभिनेत्री, लाजून झालेली लालबुंद; म्हणाली,"ते खूपचं..."
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood : देवानंद यांचा मोठा चाहतावर्ग आहे.'जॉनी मेरा नाम' या चित्रपटातील एका शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला देवानंदच्या मांडीवर बसायला सांगितलं होतं. अभिनेत्रीसाठी ही गोष्ट प्रचंड अस्वस्थ करणारी होती.
advertisement
1/7

देवानंद यांनी अनेक दशकं आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. कधी रोमँटिक हीरो तर कधी सस्पेन्स क्रिएट करताना ते दिसून आले आहेत. देवानंद यांच्यासोबत त्यावेळच्या अनेक टॉपच्या अभिनेत्रींनी स्क्रीनवर रोमान्स केला आहे.
advertisement
2/7
'जॉन मेरा नाम' या चित्रपटात हेमा मालिनी यांनी देवानंद यांच्यासोबत काम केलं होतं. या चित्रपटातील 'ओ मेरे राजा' हे सुपरहिट गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. पण या गाण्याच्या शूटिंगदरम्यान हेमा मालिनी यांनी अनेक समस्या आल्या.
advertisement
3/7
हेमा मालिनी नुकत्याच एका कार्यक्रमात उपस्थित होत्या. यावेळी अभिनेत्रीने 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटातील 'ओ मेरे राजा' या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा एक मजेदार किस्सा शेअर केला.
advertisement
4/7
ड्रीम गर्ल म्हणाल्या की,'ओ मेरे राजा' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान वीज गेली होती. अशातच देवानंद यांच्या मांडीवर बसून मला रोमँटिक सीन पूर्ण करावा लागला. ही संपूर्ण परिस्थिती माझ्यासाठी प्रचंड अस्वस्थ करणारी होती. मला लाज वाट होती. दुसरीकडे ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ हा सीन शूट करण्यासाठी लागला".
advertisement
5/7
हेमा मालिनी त्यावेळी देवानंद यांना म्हणाल्या होत्या,"मी असं जास्त वेळ बसू शकत नाही". हेमा मालिनी यांना आपला भार इतर कोणाला द्यायचा नव्हता. ड्रीम गर्ल यांना या गाण्याचं शूटिंग आयुष्यभर लक्षात राहणार आहे.
advertisement
6/7
'जॉनी मेरा नाम' हा चित्रपट 1970 रोजी प्रदर्शित झाला होता. गुन्हेगारी आणि अॅक्शन या चित्रपटात उत्तमरित्या दाखवण्यात आलं होतं. देव आनंद आणि प्राण हे बालपणी विभक्त झालेल्या भावांच्या भूमिकेत होते.
advertisement
7/7
'जॉनी मेरा नाम' या चित्रपटात हेमा मालिनी, जीवन, प्रेमनाथ, आय.एस. जोहर, इफ्तेखार, पद्मा खन्ना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बरेच तास देवानंदच्या मांडीवर बसून होती अभिनेत्री, लाजून झालेली लालबुंद; म्हणाली,"ते खूपचं..."