TRENDING:

Dharmendra : हेमा मालिनीला इम्प्रेस करण्यासाठी बेभान होऊन नाचले होते धर्मेंद्र, 50 वर्षांनंतरही गाणं सुपरहिट

Last Updated:
Dharmendra : धर्मेंद्र आणि 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांच्या लव्हस्टोरीचा एक खास किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. हेमा मालिनीला इम्प्रेस करण्यासाठी धर्मेंद्र बेभान होऊन नाचले होते.
advertisement
1/9
हेमा मालिनीला इम्प्रेस करण्यासाठी बेभान होऊन नाचले होते धर्मेंद्र
मुंबई: भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात देखणा अभिनेता म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या स्वास्थ्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. धर्मेंद्र अशातच सलमान खान, शाहरुख खानपासून ते अमीषा पटेलपर्यंत अनेक कलाकारांनी रुग्णालयात जाऊन धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली आहे.
advertisement
2/9
या पार्श्वभूमीवर, धर्मेंद्र आणि 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांच्या गाजलेल्या लव्हस्टोरीचा एक खास किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री जितकी जबरदस्त होती, तितकीच त्यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्रीही गाजली.
advertisement
3/9
१९७० साली 'मैं हसीं तू जवाँ' या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. १९७४ मध्ये रिलीज झालेल्या 'प्रतिज्ञा' चित्रपटातील 'मैं जट यमला पगला दीवाना' हे गाणे आजही सुपरहिट आहे.
advertisement
4/9
मोहम्मद रफ़ी यांनी आपल्या दमदार आवाजात गायलेले आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे आनंद बक्शी यांनी लिहिले होते. हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे.
advertisement
5/9
गंमत म्हणजे, हेमा मालिनी यांनी स्वतः कबूल केले होते की, याच गाण्यात धर्मेंद्र यांचे क्यूट डान्स मूव्ह्स पाहून त्या त्यांच्यावर खऱ्या अर्थाने फिदा झाल्या होत्या. शेतात ट्रॅक्टर चालवताना आणि बेभान डान्स करताना धर्मेंद्र यांनी हेमाला ज्या देसी अंदाजात छेडले आहे, तो सीन आजही तितकाच लोकप्रिय आहे.
advertisement
6/9
याच काळात 'सीता और गीता', 'शोले' आणि 'प्रतिज्ञा'सारख्या चित्रपटांमुळे त्यांची जोडी पडद्यावर राज्य करत होती. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमाचा प्रवास १९७० मध्ये 'तुम हसीन मैं जवान' च्या सेटवर सुरू झाला. मात्र, त्यांच्या लग्नाचा मार्ग सोपा नव्हता.
advertisement
7/9
धर्मेंद्र यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते आणि त्यांना चार मुले होती. दुसरीकडे, जितेंद्रही हेमा मालिनी यांना लग्नाची मागणी घालत होते.
advertisement
8/9
कौटुंबिक विरोध आणि सामाजिक दडपण असूनही दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पत्नीला घटस्फोट न घेता दुसरे लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये इस्लाम धर्म स्वीकारून हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले, असे बोलले जाते.
advertisement
9/9
आज धर्मेंद्र आणि हेमा मालिनी दोन वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असले तरी, त्यांचे नाते अजूनही मजबूत आहे. त्यांना ईशा आणि आहना देओल या दोन मुली आहेत. धर्मेंद्र आजही पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्या चारही मुलांशी घट्ट नाते जपून आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra : हेमा मालिनीला इम्प्रेस करण्यासाठी बेभान होऊन नाचले होते धर्मेंद्र, 50 वर्षांनंतरही गाणं सुपरहिट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल