Prajakta Mali : Bye Bye Mumbai... प्राजक्ता माळीनं घेतला मुंबईचा निरोप! पण निघाली कुठे?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीनं इन्स्टाग्राम 'बाय बाय मुंबई' म्हणत स्टोरी शेअर केली. मुंबईचा निरोप घेऊन प्राजक्ता गेली कुठे? चाहत्यांना पडलाय प्रश्न.
advertisement
1/7

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. या शोमध्ये तिचं अँकरिंग सगळ्यांच्या आवडीचं झालं आहे. प्राजक्ता एक एपिसोडही शोमध्ये दिसली नाही तरी चाहते बेचैन होतात.
advertisement
2/7
दरम्यान प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात ती मुंबई सोडून जात असल्याचं दिसत आहे. प्राजक्ताची स्टोरी पाहून चाहते चिंतेत पडले आहे की ती नेहमी निघाली कुठे आहे.
advertisement
3/7
प्राजक्ताने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एअरपोर्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर तिने कॅप्शन लिहिलंय, "बाय बाय मुंबई. मला तुझी खूप आठवण येईल. मी लवकरच परत येईन."
advertisement
4/7
प्राजक्ताची स्टोरी पाहून प्राजक्ता नेमकी निघाली कुठे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी ती परदेशात जात असल्याचा अंदाज लावली, तर काहींनी बंगळुरूला आश्रमात जात असेल असं म्हटलं. तर काहींनी प्राजक्ताची नवी देवदर्शन यात्रा सुरू झाली असावी असा अंदाज लावला आहे.
advertisement
5/7
प्राजक्ताने चाहत्यांची उत्सुकता जास्त न वाढवता अखेर ती नेमकी कुठे चालली आहे हे सांगून टाकलं. प्राजक्ताने तिच्या पुढच्या स्टोरीमध्ये ती कुठे आणि कोणासोबत आहे हे सांगून टाकलं.
advertisement
6/7
प्राजक्ताने शेअर केलेल्या तिच्या पुढच्या इन्स्टास्टोरीमध्ये दिसतंय की महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टीमसोबत आहे. कलाकारांबरोबर तालमीचा फोटो तिनं शेअर केला आहे.
advertisement
7/7
या फोटोमध्ये सचिन मोटे, सचिन गोस्वामी, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमित फाळके असी सगळी मंडळी दिसत आहेत. हास्यजत्रेची संपूर्ण टीम ही सध्या नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेली आहे. प्राजक्ताने तिच्या स्टोरीमध्ये #nagpur असं लिहिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : Bye Bye Mumbai... प्राजक्ता माळीनं घेतला मुंबईचा निरोप! पण निघाली कुठे?