'माझे वडील जिवंत', धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा, ईशा देओलचं स्पष्टीकरण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dharmendra Health Update : धर्मेंद्र मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. निधनाच्या अफवा खोट्या असून ईशा देओलने प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
advertisement
1/6

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.
advertisement
2/6
दरम्यान त्यांचं निधन झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या. त्यांच्या निधनाची चुकीची माहिती समोर येताच त्यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओल हिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांची हेल्थ अपडेट दिली. त्याचबरोबर तिने निधनाच्या अफवांवर नाराजी व्यक्त केली.
advertisement
3/6
धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिने स्वतः पोस्ट लिहून त्यांच्या निधनाची माहिती खोटी असल्याचं सांगितलं आहे. ईशाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "मीडिया अफवांचा वेगाने प्रसार करत आहे. माझे वडील स्थिर आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे."
advertisement
4/6
"आमच्या कुटुंबाला कृपया थोडी प्रायव्हसी द्या ही नम्र विनंती. पप्पा लवकर बरे व्हावे यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार."
advertisement
5/6
दरम्यान धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा अभिनेता सनी देओल याच्या टीमकडून देखील रात्री त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं होतं. सनी देओलच्या टीमकडून आलेल्या माहितीत असं सांगितलं होतं की, "धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पुढील माहिती आणि लेटेस्ट अपडेट वेळोवेळी शेअर केल्या जातील."
advertisement
6/6
"कृपया त्यांच्या प्रकृतीबाबत खोट्या अफवा पसरवू नका. सर्वांना विनंती आहे की, ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करा आणि कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करा."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझे वडील जिवंत', धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा, ईशा देओलचं स्पष्टीकरण