TRENDING:

IND vs SA : ऑक्सिजनची पातळी 50 वर, 10 मिनिटंही उभा राहू शकला नाही टीम इंडियाचा खेळाडू! साऊथ अफ्रिकाविरुद्ध 'नो एन्ट्री'

Last Updated:
India vs South Africa : नोव्हेंबर 30 पासून सुरू होणाऱ्या साऊथ अफ्रिकेविरुद्घच्या मालिकेतील श्रेयसच्या सहभागाबद्दल अनिश्चितता असल्याचं पहायला मिळत आहे.
advertisement
1/8
IND vs SA : ऑक्सिजनची पातळी 50 वर, 10 मिनिटंही उभा राहू शकला नाही टीम इंडियाचा ख
आगामी साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. भारताचा उपकर्णधार खेळणार नसल्याचं समजतंय.
advertisement
2/8
टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याच्या तंदुरुस्तीबद्दल शंका निर्माण झाली आहे. ऑस्टेलियातून परतल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आणखी वेळ लागेल, असे संकेत मिळत आहेत.
advertisement
3/8
अय्यरच्या सध्याच्या स्थितीबद्दल निवड समितीला माहिती देण्यात आली आहे. वैद्यकीय अहवालानुसार (medical report) त्याला पूर्णपणे मॅच फिट होण्यासाठी जवळपास एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.
advertisement
4/8
भारतीय क्रिकेट बोर्डातील एका सूत्राने सांगितले की, तो पूर्णपणे मॅच फिट होण्यासाठी अधिक वेळ घेईल आणि बोर्ड तसेच निवड समितीला दुखापतीनंतर कोणतीही घाई करायची नाहीये.
advertisement
5/8
त्यामुळे श्रेयस अय्यर साऊथ आफ्रिका वनडे मालिकेसाठी खेळण्याची शक्यता कमी आहे. अय्यरच्या दुखापतीच्या वेळी घडलेला एक गंभीर प्रसंग देखील समोर आला आहे.
advertisement
6/8
एका सूत्राने स्पष्ट केले की, दुखापतीमुळे अय्यरच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी 50 पर्यंत खाली आली होती आणि सुमारे 10 मिनिटांपर्यंत तो नीट उभा राहू शकत नव्हता.
advertisement
7/8
श्रेयसच्या डोळ्यांभोवती संपूर्ण अंधार पसरला होता आणि त्याला सामान्य स्थितीत येण्यासाठी काही वेळ लागला होता. त्यामुळे बीसीसीआय कोणतीही रिस्क घेणार नाहीये.
advertisement
8/8
टीम इंडिया 14 नोव्हेंबरपासून दोन कसोटी मॅच खेळल्यानंतर टीम इंडिया रांची, रायपूर आणि विशाखापट्टणम येथे 3 वनडे मॅच खेळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : ऑक्सिजनची पातळी 50 वर, 10 मिनिटंही उभा राहू शकला नाही टीम इंडियाचा खेळाडू! साऊथ अफ्रिकाविरुद्ध 'नो एन्ट्री'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल