बॉक्स ऑफिसवरही वर्षभर पडणार पैशांचा पाऊस, 2026 मध्ये रिलीज होणार या 7 बहुप्रतीक्षित फिल्म
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Upcoming Movies : बॉक्स ऑफिसवर 2026 मध्ये अनेक बहुप्रतीक्षित बॉलिवूड आणि साऊथचे चित्रपट रिलीज होणार आहेत. थरार, नाट्य आणि मनोरंजनाचा डबल डोस असणारे हे चित्रपट प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणार आहेत.
advertisement
1/7

किंग : शाहरुख खानचा आगामी 'किंग' हा चित्रपट 2026 मध्ये रिलीज होणार आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये शाहरुखच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अद्याप रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नसली तरी या चित्रपटातील शाहरुखचा फर्स्ट लूक मात्र समोर आला आहे.
advertisement
2/7
द पैराडाइज : 'द पैराडाइज' या चित्रपटामुळे नानी चर्चेत आहे. शानदार विजुअल्स असणाऱ्या या चित्रपटासाठी हॉलिवूड स्टार रयान रेनॉल्ड्सला विचारणा झाली आहे. जागतिक स्तरावर हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.
advertisement
3/7
स्पिरिट : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'स्पिरिट' हा जबरदस्त अॅक्शन, थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात पॅन इंडिया सुपरस्टार प्रभास महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
advertisement
4/7
ग्लोब ट्रॉटर : एस.एस. राजामौली RRR नंतर आता 'ग्लोब ट्रॉटर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात महेश बाबू आण प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. अनेक देशांत या चित्रपटाचं शूटिंग होत आहे. 2026 मधला देशातला हा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट ठरू शकतो.
advertisement
5/7
थलापती विजय : थलापती विजयचा आगामी 'नायकन' हा चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एच. विनोथ दिग्दर्शित या चित्रपटात पूजा हेगडे आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
6/7
रामायण : नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या पौराणिक चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग 2026 मध्ये तर दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
advertisement
7/7
टॉक्सिक : टॉक्सिक हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक पीरियड गँगस्टर ड्रामा असून गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केला आहे. जगभरात हा चित्रपट इंग्लिश, कन्नड, हिंदी, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉक्स ऑफिसवरही वर्षभर पडणार पैशांचा पाऊस, 2026 मध्ये रिलीज होणार या 7 बहुप्रतीक्षित फिल्म