डिवोर्स झाला, ब्रेकअपही करून बसली, मलायका अरोरा आजही या अभिनेत्यावर फिदा; बेडरूममध्ये लावलंय खास पोस्टर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Malaika Arora Crush : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आजही आपल्या क्रशला विसरलेली नाही. आजही अनेकदा अभिनेत्री या अभिनेत्याबद्दल बोलताना दिसून येते. तसेच तिच्या बेडरूममध्येही या अभिनेत्याचं खास पोस्टर लावलेलं आहे.
advertisement
1/7

मलायका अरोरा नेहमीच आपल्या फिटनेस आणि स्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. पण आजही अभिनेत्री आपल्या जुन्या क्रशला विसरलेली नाही. अभिनेत्रीने तिच्या बेडरूममध्येही या अभिनेत्याचं पोस्टर लावलेलं आहे.
advertisement
2/7
मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नुकतीच सोशल मीडियावर अभिनेत्री आपल्या क्रशबद्दल प्रेम लुटताना दिसून आली आहे.
advertisement
3/7
चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे 'टू मच विथ काजोल अॅन्ड ट्विंकल' या अनन्या पांडेच्या सेलिब्रिटी टॉक शोमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने आपल्या पालकांच्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य केलं.
advertisement
4/7
अनन्या यावेळी म्हणाली की, मलयाका माझे वडील चंकी पांडे यांचं पोस्टर आजही सोबत ठेवते. बेडरूममध्येही हे पोस्टर लावलेलं आहे.
advertisement
5/7
मलायकाने एकदा चंकी पांडे यांचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. हे पोस्टर शेअर करत तिने लिहिलं होतं,"चंकी पांडे आजही माझ्याकडे तुमचं पोस्टर आहे. चिंता करू नका".
advertisement
6/7
मलायका अरोराने 'झलक दिखला जा'च्या मंचावर सांगितलं होतं की, चंकी पांडे तिचे पहिले क्रश आहेत. मलायकच नव्हे तर फराह खानचा क्रशदेखील चंकी पांडे आहेत.
advertisement
7/7
मलायका अरोराच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
डिवोर्स झाला, ब्रेकअपही करून बसली, मलायका अरोरा आजही या अभिनेत्यावर फिदा; बेडरूममध्ये लावलंय खास पोस्टर