दारू प्यायला एकटं जायचं नाही, पुष्कर श्रोत्रीला वडिलांनी सांगितले नियम; चौथा तर कायम लक्षात ठेवा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pushkar Shrotri on Rules of Drinking Alcohol : अभिनेता पुष्कार श्रोत्री वयात आला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला दारू प्यायला जाण्याआधीचे चार महत्त्वाचे नियम समजावून सांगितले. चौथा नियम तर कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे.
advertisement
1/7

कधी कोणत्या गोष्टी करायच्या आणि कधी कोणत्या गोष्टी करायच्या हे आपल्याला अनेकदा आपल्या मोठ्यांनी सांगितलेल्या असतात. मुलांनी काय करावं आणि काय नाही हे अनेकदा त्यांचे पालक त्यांना सांगतात.
advertisement
2/7
पण दारू प्यायला जाताना कोणते नियम लक्षात ठेवायचे हे बहुदा कोणते पालक आपल्या मुलाला सांगत नसतील. प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या वडिलांनी मात्र त्याला दारू प्यायचे चार नियम व्यवस्थित समजावून सांगितले होते. पुष्करने नुकत्याच एका मुलाखतीत याचा खुलासा केला.
advertisement
3/7
पालकांनी मुलांना आणि मुलींना त्याच्या योग्य वयात योग्य गोष्टी समाजावून सांगितल्या पाहिजे याविषयी बोलताना पुष्करने त्याच्या वडिलांबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, एकटा दारू प्यायला जायचं नाही. दुसरी गोष्ट दारू पिताला तू काय खातोस हे महत्त्वाचं आहे. उगाच अरबट चरबट खाऊन शरीराची हानी करून घेऊ नको, हेल्दी खा."
advertisement
4/7
"तिसरी गोष्ट तू ज्यांच्यासोबत प्यायला जातोयस ते तुझे मित्र आहेत ना हे आधी कन्फर्म करून घे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारू पिताना चर्चेला घ्यायचे विषय, पॉलिटिक्स घेऊ नये, क्रिकेट घेऊ नये हे विषय दारू पिताना घ्यायचे नाहीत. ज्याच्यामुळे वाद होतील असे विषय घ्यायचे नाहीत."
advertisement
5/7
पुष्करने पुढे सांगितलं, "हेच तर आहे ना. दारू पिताना घेण्यासारखे खूप विषय आहेत. पॉलिटिक्स हा दारू पिताना घ्यायचं. क्रिकेट, इंडिया पाकिस्तान, का दारू पिताना चर्चेला घ्यायला पाहिजे. भांडणं होतात."
advertisement
6/7
"असतात कोणी राइट, लेफ्ट विंगचे... ते जर एकत्र एका टेबलवर आले काय होईल. आता पॉलिटिशियन्सच आपल्याला इतके विषय चर्चेला देत आहेत ते आपण घेऊ शकतो."
advertisement
7/7
"आपलं ते काम आहे का, त्यासाठी त्यांची टीम आहे, तुला आणि मला काय गरज आहे. तुमच्या विचारांना कोणी महत्त्व देणार आहे का? मग कशासाठी असे विषय चर्चेला घ्यायचे", असंही पुष्करनं सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दारू प्यायला एकटं जायचं नाही, पुष्कर श्रोत्रीला वडिलांनी सांगितले नियम; चौथा तर कायम लक्षात ठेवा