TRENDING:

Dharmendra Family : 2 पत्नी, 6 मुलं, 3 सूना अन् 13 नातवंड! धर्मेंद्र यांचं भलमोठं कुटुंब, कोण काय करतं?

Last Updated:
Dharmendra Family:अभिनेते धर्मेंद्र गेली 65 वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. 300 हून अधिक सिनेमात काम करणाऱ्या धर्मेंद्र यांचा इक्कीस हा सिनेमा येत्या डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमात काम करत बॉलिवूडमध्ये त्यांचा मोठा मित्र परिवार जमवला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का धर्मेंद्र यांची खरी फॅमिली खूप मोठी आहे. त्यांच्या घरात त्यांची 13 नातवंड आहेत, अनेक सूना आहेत. पाहूयात धर्मेंद्र देओल यांची फॅमिली ट्री.
advertisement
1/9
2 पत्नी,6 मुलं, 3 सूना अन् 13नातवंड! धर्मेंद्र यांचं भलमोठं कुटुंब,कोण काय करतं?
धर्मेंद्र यांचा भाऊ अजित सिंह देओल यांनी चित्रपटांमध्ये नशीब आजमावलं पण त्यांना तेवढी प्रसिद्धी मिळवली नाही.  'प्रतिज्ञा', 'मेहरबानी', 'वीरता', आणि 'पुट्ट जट्ट दा' सारख्या सिनेमांत त्यांनी काम केलं. अजित सिंगचा मुलगा अभय देओल आहे. त्याने देखील अनेक सिनेमांत काम केलं.  धर्मेंद्र यांचा एक चुलत भाऊ वीरेंद्र सिंग देओल देखील आहे. ज्यांनी पंजाबी चित्रपटसृष्टीत बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.
advertisement
2/9
धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली गावात झाला. त्यांचं खरं नाव धर्मसिंग देओल आहे. ते एका जाट शीख कुटुंबातून येतात. त्यांचे वडील केवल किशन सिंग देओल हे एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते, तर त्याची आई सतवंत कौर ही खूप धार्मिक होती.
advertisement
3/9
आता धर्मेंद्रच्या विवाहित जीवनाकडे वळूया. धर्मेंद्र 19 वर्षांचे असताना त्यांचं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं.  धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना दोन मुले आणि दोन मुली अशी चार मुले झाली. सनी देओल, बॉबी देओल, विजेता आणि अजिता अशी त्यांची नावं आहेत.
advertisement
4/9
सनी देओलला दोन मुले आहेत, करण आणि राजवीर आहेत. बॉबी देओललाही दोन मुले आहेत. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या दोन मुली, विजेता आणि अजिता. त्या दोघीही नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिल्या.  विजेताला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, तर अजिताला दोन मुली आहेत.
advertisement
5/9
धर्मेंद्रच्या सुनांबद्दल बोलायचे झाले तर सनी देओलचे लग्न पूजा देओलशी झाले आहे. तिचं खरं नाव  लिंडा देओल असून ती अँग्लो-इंडियन आहे. बॉबी देओलने 1996 मध्ये तान्या आहुजाशी लग्न केले. तान्या एक  व्यावसायिक महिला आहे. त्यांना दोन मुलं आहेत. आर्यमन आणि धरम अशी त्यांची नावं आहेत.  धर्मेंद्रचा नातू, करण देओल (सनीचा मुलगा), देखील विवाहित आहे. त्याने 2023 मध्ये त्याची गर्लफ्रेंड दिशा आचार्यशी लग्न केलं.
advertisement
6/9
धर्मेंद्र आणि प्रकाश कौरच्या मुलींकडे वळूया. अजिता आणि विजेता कधीही चित्रपटात दिसल्या नाहीत किंवा  कधीच कॅमेऱ्यासमोर आल्या नाहीत. अजिता व्यवसायाने शिक्षिका आहे. तिचा नवरा किरण चौधरी हा एक भारतीय-अमेरिकन डेन्टिस्ट आहे. संपूर्ण कुटुंब अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहते. त्यांना निकिता आणि प्रियांका अशा दोन मुली आहेत. विजेताचं लग्न विवेक गिलशी झालं आहे. त्यांना एक मुलगा साहिल आणि एक मुलगी जिचं नाव प्रेरणा आहे.
advertisement
7/9
धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. दोघेही सिनेमाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचा पिता होते. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नी प्रकार कौर यांना डिवोर्स देण्यात नकार दिला. असं म्हटलं जातं की त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला हेमा यांच्या लग्न केलं. पण 2004 मध्ये या सगळ्या अफवा फेटाळून लावल्या.
advertisement
8/9
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनाही दोन मुली झाल्या. एक ईशा देओल आणि दुसरी अहाना देओल. धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्या मुलींना चित्रपटात येण्यापासून परावृत्त केले. पण हेमा यांनी त्यांच्या मुलींना अभिनेत्री म्हणून वाढवलं. पण दोघी मुलींना त्यांच्या आई वडिलांइतकी प्रसिद्धी मिळाली नाही.
advertisement
9/9
ईशा देओलचे लग्न भरत तख्तानीशी झालं होतं. पण काही महिन्यांआधीच त्यांचा डिवोर्स झाला. तर अहानाचा पती वैभव वोहरा आहे. त्यांना दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे. धर्मेंद्र यांची खूप मोठी फॅमिली आहे. ज्यात त्यांच्या दोन पत्नी, दोन सूना, एक नातसून आणि तब्बल नातवंडे आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra Family : 2 पत्नी, 6 मुलं, 3 सूना अन् 13 नातवंड! धर्मेंद्र यांचं भलमोठं कुटुंब, कोण काय करतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल