TRENDING:

'मी वचन देते की...' सकाळी 7:01 वाजता ईशाची पोस्ट, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 15 दिवसांनी व्यक्त झाली

Last Updated:
Esha Deol Post for Dharmednra : अभिनेत्री ईशा देओल हिनं धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाच्या दिवशी भावुक पोस्ट लिहिली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाच्या 15 दिवसांनी ईशा पहिल्यांदा व्यक्त झाली.
advertisement
1/6
'मी वचन देते की...' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 15 दिवसांनी व्यक्त झाली लेक ईशा
बॉलिवूडचे हि मॅन अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककला पसरली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधानाची माहिती शेवटपर्यंत गुप्त ठेवली होती. दरम्यान धर्मेंद्र यांच्या निधनाच्या जवळपास 15 दिवसांनी त्यांची मुलगी ईशा देओल हिनं सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे. ईशाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
2/6
ईशाने पोस्टसहीत धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही फोटो देखील शेअर केलेत. ईशाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "टू माय डार्लिंग पप्पा. आपला करार, आपलं नातं सगळ्यात मजबूत आहे. आपण हे नातं प्रत्येक जन्मात, प्रत्येक जगात आणि त्याही पलीकडे कायम सोबत आहे. पप्पा आपण नेहमीच एकत्र आहोत. स्वर्ग असो किंवा पृथ्वी, आपण एक आहोत."
advertisement
3/6
"आत्ता मी तुम्हाला आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी अत्यंत प्रेमाने, जपून आणि अमूल्यपणे माझ्या हृदयात, खूप खोल, कायमस्वरूपी जपून ठेवलं आहे. त्या जादुई, अमूल्य आठवणी… जीवनातील शिकवण, मार्गदर्शन, तुमचं प्रेम, तुमची प्रतिष्ठा आणि तुम्ही मला मुलगी म्हणून दिलेली ताकद, याची जागा कुणीही घेऊ शकत नाही."
advertisement
4/6
ईशाने पुढे लिहिलंय, "मला तुमची खूप आठवण येते पप्पा… तुमची संरक्षण देणारी मिठी जणू मऊशार पांघरुणासारखी वाटायची. तुमचे कोमल पण मजबूत हात ज्यात शब्दांशिवाय अनेक भावना असायच्या आणि माझं नाव घेऊन तुमचा आवाज जो नंतर संपत न जाणाऱ्या गप्पा, हसणं आणि शायरींनी भरलेला असायचा."
advertisement
5/6
"नेहमी नम्र राहा, आनंदी राहा, निरोगी आणि मजबूत रहा, तुमचं ब्रीदवाक्य. तुमची परंपरा अभिमानाने आणि सन्मानाने पुढे नेण्याचं मी वचन देते. आणि तुम्ही जसे मला प्रेम दिलं तसंच प्रेम तुम्हांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन."
advertisement
6/6
"माझं तुमच्यावर अपरिमित प्रेम आहे पप्पा. तुमची लाडकी मुलगी, तुमची ईशा, तुमची बिट्टू", म्हणत ईशाने तिच्या पोस्टचा भावनिक शेवट केला. तिची ही पोस्ट पाहून बाप लेकीमध्ये किती घट्ट नातं होतं याची जाणीव होते. ईशाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी वचन देते की...' सकाळी 7:01 वाजता ईशाची पोस्ट, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 15 दिवसांनी व्यक्त झाली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल