TRENDING:

'मी निवडणुकीला उभं राहावं...' वडील माजी मुख्यमंत्री, दोन्ही भाऊ राजकारणात, आता रितेश देशमुखही लढवणार निवडणूक?

Last Updated:
Riteish Deshmukh in Politics: दोन भाऊ सक्रिय राजकारणात असताना आणि स्वतः रितेश राजकीय घडामोडींवर रोखठोक भाष्य करत असताना, "रितेश राजकारणात कधी येणार?" हा प्रश्न महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून पडला आहे.
advertisement
1/7
वडील माजी मुख्यमंत्री, दोन्ही भाऊ राजकारणात, आता रितेश देशमुखही लढवणार निवडणूक?
महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख. रितेशचं नाव निघालं की डोळ्यांसमोर येतो तो त्याचा पडद्यावरचा अभिनय आणि तितकीच साधी राहणी. पण रितेशची दुसरी ओळख म्हणजे तो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे.
advertisement
2/7
घरामध्ये राजकारणाचं बाळकडू मिळालेलं असताना, दोन भाऊ सक्रिय राजकारणात असताना आणि स्वतः रितेश राजकीय घडामोडींवर रोखठोक भाष्य करत असताना, "रितेश राजकारणात कधी येणार?" हा प्रश्न महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून पडला आहे. अखेर, रितेशने या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं आहे.
advertisement
3/7
नुकतीच रितेशने राहुल महाजनच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. राहुल आणि रितेश या दोघांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे, दोघांनीही राजकारण खूप जवळून पाहिलंय. राहुलने जेव्हा रितेशला त्याच्या राजकीय एन्ट्रीबद्दल विचारलं, तेव्हा रितेशने जे उत्तर दिलं ते सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतंय.
advertisement
4/7
रितेश म्हणाला, "लोकांचं माझ्यावर अभिनेता म्हणून प्रेम आहे आणि मी त्यात सध्या प्रचंड आनंदी आहे. मला राजकारण समजतं, आवडतंही... पण राजकारण समजणं आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे."
advertisement
5/7
रितेशने आपल्या बोलण्यातून राजकारण्यांच्या कष्टाचा आदर केला. तो म्हणाला, "मी आज माझ्या भावांना पाहतोय. ते लोकांसाठी कसं काम करतात, हे मी जवळून बघतो. घरी जेवताना आमच्यात राजकीय चर्चा होतात, पण याचा अर्थ असा नाही की मी निवडणुकीला उभं राहावं. राजकारणासाठी ज्या प्रकारची कमिटमेंट आणि वेळ द्यावा लागतो, तो सध्या माझ्याकडे नाही. जे काम केल्याने तुम्हाला मनापासून आनंद मिळतो, तेच तुम्ही केलं पाहिजे आणि मला अभिनयात आनंद मिळतो."
advertisement
6/7
निवडणुकीच्या गणितावर भाष्य करताना रितेशने एक मुद्दा मांडला. तो म्हणाला, "तुम्ही मोठे स्टार आहात म्हणून निवडणूक जिंकणं सोपं असतं, हा गैरसमज आहे. लोक खूप हुशार आहेत. त्यांना अभिनेत्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि नेत्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. अनेक कलाकारांनी राजकारणात जाऊन चांगलं काम केलंय, त्यांचं मला कौतुकच आहे, पण प्रत्येकालाच ते जमेल असं नाही."
advertisement
7/7
विलासराव देशमुखांचा वारसा रितेशने आपल्या वैचारिक प्रगल्भतेतून जपला आहे. त्याने स्पष्ट केलं की, त्याला सत्तेचा मोह नाही. सत्तेत असणं किंवा विरोधात असणं हे राजकारणाचे भाग आहेत, पण त्याला सध्या कॅमेऱ्यासमोर राहूनच प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी निवडणुकीला उभं राहावं...' वडील माजी मुख्यमंत्री, दोन्ही भाऊ राजकारणात, आता रितेश देशमुखही लढवणार निवडणूक?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल